HW Marathi
Uncategorized

लोकसभेच्या निकालानंतर अचानक देशातील जनतेचे “चौकीदार” अदृश्य

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना एकहाती सत्ता मिळाली आहे. निकाल हाती आल्यानंतर अवघ्या काही मिनिटात मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरील “चौकीदार” शब्द हटविला आहे. विजय मिळाल्यानंतर चौकीदार हटविल्याने सर्वांच्या भुवया उंचविल्या होत्या. यानंतर खुद मोदींनी ट्वीट कर यासंदर्भात खुलासा केला आहे. यात मोदींनी म्हटले की, आता  चौकीदार स्पिरीट नव्या पातळीवर न्यायची वेळ आली असल्याचे ट्विट केले आहे.

‘चौकीदाराचे स्पिरीट प्रत्येक क्षणी जिवंत ठेऊया आणि भारताच्या विकासासाठी काम करूया. माझ्या ट्विटर अकाऊटंवरुन चौकीदार शब्द हटवतोय. पण तो माझा अभिन्न हिस्सा राहील. तुम्ही सर्वांनीदेखील असेच करावे अशी विनंती करतो,’ असे मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मोदींनी दुसऱ्या एका ट्विटमधून देशातील जनतेचे कौतुक केले. ‘जनता चौकीदार झाली आणि त्यांनी देशाची सेवा केली. जातीयवाद, भ्रष्टाचार, भांडवलवाद यांच्यासारख्या राक्षसांपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी चौकीदार शब्द अतिशय सामर्थ्यशाली ठरला,’ असे मोदींनी त्यांच्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले.

 

 

Related posts

कल्याणमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याची महिलेला मारहाण, CCTV

News Desk

ग्रामीण भागातही एनसीसीची विस्तार-सुभाष भामरे

News Desk

शरद पवार हेच शेतकऱ्यांचे कैवारी आहेत, लक्षात घ्या | अजित पवार

News Desk