HW Marathi
Uncategorized

आजम खान यांची जयाप्रदावर अश्लील टीप्पणी, राष्ट्रीय महिला आयोगाने बजावली नोटीस

रामपूर | निवडणुकी ऐन रंगात आली असतानाच विरोधक एकमेंकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. निवडणुकांच्या दरम्यान कोणत्याना कोणत्या नेत्यांची जीभ घसरणे हे प्रसार सर्रास पाहायला मिळतात. यात आता समाजवादी पक्षाचे महासचिव आजम खान यांनी काल (१४ एप्रिल) अश्लील शब्दात अभिनेत्री आणि भाजपच्या उमेदवार जया प्रदा यांच्यावर केली आहे. या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने आजम खान यांना नोटीस बजावली आहे.

आजम खान नेमके काय म्हणाले

रामपूर वासियो, उत्तर प्रदेश वासियो आणि देशवासियो ज्यांना चेहरा ओळखायला तुम्हा १७ वर्षे लागली.  मी त्यांना १७ दिवसात ओळखले, असे अश्लील शब्दात आझम खान यांनी अभिनेत्री आणि भाजपच्या उमेदवार जया प्रदा यांच्यावर टीका करताना वापरले. आझम खान मंचावर भाषण करत असताना त्यावेळी व्यासपीठावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव देखील उपस्थित होते.

आजम खान यांनी केलेल्या अश्लील टीप्पणीनंतर जयाप्रदा यांनी म्हटले की, ”आझम खान यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देऊ नये. कारण हा माणूस निवडणूक जिंकला तर लोकशाहीचे काय होईल, समाजामध्ये महिलांना स्थान राहणार नाही. आम्ही कोठे जायचे? मी मेल्यानंतर तरी तुम्हाला समाधान मिळणार का? तुम्हाला काय वाटते मी घाबरुन रामपूर सोडून निघून जाईन ? मी रामपूर सोडणार नाही” असे जयाप्रदा यांनी सांगितले.

याप्रकरणी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्वीट करत आजम खान यांचा खरपूस समाचार घेतला. त्याचबरोबर मुलायम सिंह यादव यांना विचारणा केली आहे. सुषमा स्वराज म्हणाल्या की, ‘मुलायम भाई तुम्ही समाजवादी पक्षाचे पितामह आहात, तुमच्या समोर रामपूरमध्ये द्रोपदीचे वस्त्रहरण होत आहे. तरी तुम्हीही भीष्मासारखे मौन बाळगण्याची चुक करू नका”, असा सवाल उपस्थित करत त्यांना सल्ला देखील दिला आहे. असे ट्विट करत स्वराज यांनी अखिलेश यादव, जया बच्चन आणि डिंपल यादव यांना टॅग केले आहे.

 

Related posts

भगवा दहशतवाद देशात सक्रीय

News Desk

पालघरमधील निवडणुकीतील गोंधळा विरोधात जनहित याचिका दाखल

News Desk

आदिती दिसणार अंजलीच्या भूमिकेत

News Desk