नवी दिल्ली | जगभरात कोरोनाने थैमान घातला आहे. वटवाघळांपासून कोरोना व्हायरस पसरला गेला अशा अनेक गोष्टी या वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. भारतात या वटवाघळांमुळेच कोरोना विषाणू पसरला का असाही प्रश्न विचारला, भारतामध्ये वटवाघळांमुळे कोरोना आला नाही किंवा पसरला नाही, असे आज (१५ एप्रिल) इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल अँड रिसर्चचे प्रमुख पद्मश्री रमण गंगाखडेकर सांगितले.
We also conducted surveillance, in which we found that there are two types of bats, and they carried #Coronavirus which was not capable of affecting humans. It's rare, maybe once in 1000 years that it gets transmitted from bats to humans: Raman Gangakhedkar, ICMR) (2/2) https://t.co/vcWnrEjqo5
— ANI (@ANI) April 15, 2020
रामण गंगाखडेकर म्हणाले की, भारतामध्ये वटवाघळमुळे कोरोना आला नाही किंवा पसरलाही नाही. भारतातील आतापर्यंत दोन प्रकारच्या वटवाघळांवर संशोधन करण्यात आले. या दोन्ही वटवाघळांमध्ये कोरोना विषाणू सापडला आहे. मात्र, तो विषाणू माणसामध्ये संसर्गित होणारा नाही. माणसामध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण पॅनगोलियन नावाच्या प्राण्यापासून झाल्याचा अंदाज त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत मांडला. कोरोना वटवाघळामुळे सद्यस्थितीला झालेला नाही, अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली.
दरम्यान, यासंबधित इंडियन जर्नल ऑफ रिसर्चमध्ये अहवाल प्रकाशित झाला आहे. त्यानुसार २५ वटवाघळांमध्ये कोरोना विषाणू सापडला आहे. या अहवालात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की वटवाघळांमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूचा महामारीला जबाबदार कोरोना थेट काही संबंध नाही. कोरोना महामारीसाठी सार्स जबाबदार असल्याचेही सांगण्यात आले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.