HW News Marathi
Uncategorized

… तर राऊतांची जीभ जागेवर राहणार नाही !

मुंबई | “या व्यक्तीला सत्तेचा माज चढलया, उदयनराजेंकडे वंशजां असल्याचे पुरावे मागाल. तर तुमची जीभ जागेवर राहणार नाही,” अशी धमकी भाजपचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिली आहे. राणे ऐवढ्यावर बोलून न थांबता, राणेंनी मुंबईतील भाजप कार्यलयातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि महाविकासआघाडीवर आज (१६ जानेवारी) आयोजित पत्रकार परिषदेत तोफ डागली आहे.

दरम्यान, राणे म्हणाले की, “राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की अजित पवार ?, महाराजांच्या वशंजां पुरावे मागणारे संजय राऊत कोण?, जे राऊत बोलताय ते उद्धव ठाकरेंचे मत आहे का?, इंदिरा गांधींबद्दल राऊतांच्या मनात आदर की द्वेष?, महाविकसा आघाडीतून शिव का ? वगळले, “असे अनेक प्रश्न राणेंनी त्यांच्या पत्रकार परिषदेतून राज्य सरकार आणि संजय राऊतांनी उपस्थित केले आहेत.

“मुख्यमंत्री पदाच्या स्वार्थासाठी तडजोड करणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊच नये,” असे म्हणत संजय राऊत यांच्या वक्तव्याचा राणेंनी निषेध केला. तसेच महाविकास आघाडीच्या या आतापर्यंत सरकारने कामलाही सुरुवात केलेली नाही. आठवडेबाजाराप्रमाणे मंत्री एक दिवस मंत्रालयात येतात आणि संध्याकाळी परत जातात असे म्हणत कॅबिनेटचा कारभार आठवडेबाजार म्हणून राणेंनी टीका केली.

नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • मागील सरकारने काय केले यांची चर्चा आहे. पण हे सरकार
  • संजय राऊतांचे मानसिक संतुलन बिघडले
  • मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे आठवडी बाजार
  • छत्रपतींच्या नावाने महाराष्ट्राला ओळखले जाते.
  • हे सरकार फक्त घोषणा करतेय, बाकी काही नाही करत
  • महाराजांच्या वशंजां पुरावे मागणारे संजय राऊत कोण?
  • कर्जमाफीचा डिटेल कोणताही जीआर नाही
  • कॅबिनेटमध्ये आजही लोकपयोगी निर्णय नाही
  • जे राऊत बोलताय ते उद्धव ठाकरेंचे मत आहे का?
  • संजय राऊतांनी पुन्हा असे बोलयाचे धाडस करू नये
  • राऊत दाऊतशी काय बोलेले याची चौकशी करा
  • छत्रपती शिवाची महाराजा आमचे दैवत आहे
  • उदयनराजे भोसले आणि शिवेंद्र राजे यांच्याकडे राऊतांनी पुरावे मागू नये
  • राज्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की अजित पवार असा प्रश्न, नारायण राणेंना पडला आहे
  • लोकशाही हिताचा कोणातही निर्णय नाही, फक्त घोषणा
  • सरकारचे कुठेही अस्तित्व दिसत नाही
  • इंदिरा गांधी बद्दल राऊतांच्या मनात काय आहे
  • उदयनराजे किंवा शिवेंद्र राजे
  • राऊतांना फार माज आलाय, जीभ फार चालतेय
  • काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावे
  • महाविकसाआघाडीतून शिव का ? वगळले
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर राज्य सरकार सीबीआयला कागदपत्रे देण्यास तयार!

News Desk

Sharad Pawar On Harshwardhan Patil | हर्षवर्धनसाठी भरणे थांबणार होते,पण..त्याला भाजपात जायचं होतं..

Arati More

Budget 2019 : पेट्रोल-डिझेल लीटरमागे १ रुपयांनी महागणार

News Desk