नवी दिल्ली | भारताच्या चांद्रयान – २ने तीन दिवसांपूर्वीच चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्याची बातमी इस्त्रोने सांगितले होती. यानंतर ‘चांद्रयान-२’ चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असून ‘चांद्रयान-२’ने सुमारे दोन हजार सहाशे ५० किमीच्या उंचीवरून चंद्राचा पहिला टिपलेला पहिला फोटो इस्त्रोने त्यांच्या ट्वीटर हँडलवरून शेअर केले आहे. चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणे इस्रोच्या चंद्रयान-२ मोहिमेतील दुसरा महत्वाचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे इस्रोचे अध्यक्ष के. सीवन यांनी सांगितले होते. त्यामुळे ही ऐतिहासिक कामगिरी इस्रोसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
Take a look at the first Moon image captured by #Chandrayaan2 #VikramLander taken at a height of about 2650 km from Lunar surface on August 21, 2019.
Mare Orientale basin and Apollo craters are identified in the picture.#ISRO pic.twitter.com/ZEoLnSlATQ
— ISRO (@isro) August 22, 2019
चांद्रयान -२ बुधवारी (१४ ऑगस्ट) चंद्राच्या दिशेने कक्षेकडे मार्गस्थ करण्यात यश आले. तर मंगळवारी (२०ऑगस्ट) ऐतिहासिक कामगिरी करत भारताच्या चांद्रयान-२ ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असल्याची माहिती इस्रोने दिली. चांद्रयान-२ अंडाकृती कक्षेत २४ तास प्रदक्षिणा घालणार आहे. यादरम्यान चांद्रयान -२चा वेग १०.९८ किमी प्रतिसेकंदवरून कमी करून १.९८ किमी प्रतिसेकंद करण्यात येणार आहे. चांद्रयान-२ चा वेग ९० टक्क्यांनी कमी केलाय. चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे अनियंत्रित होऊन धडकू नये.
यासाठी चांद्रयान-२ चा वेग कमी करण्यात आलाय. ७ सप्टेंबरला चंद्रायान- २ची लँडिंग पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रोमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली आहे. ‘चंद्रयान-२’ चे श्रीहरीकोटा येथून २२ जुलैला दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी ‘चंद्रयान-२’ चे यशस्वी प्रक्षेपण झाले. त्यानंतर १६ मिनिटांनी चंद्रयान-२ बाहुबली रॉकेटपासून वेगळे होऊन पृथ्वीच्या कक्षेत फिरण्यास सुरुवात झाली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.