HW News Marathi
Uncategorized

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या १६० जणांना केले क्वॉरंटाईन

मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेरील चहावाल्याला कोरोनाची लागण झाल्याचे काल (७ एप्रिल) समोर आले. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानाबाहेरील सर्व परिसर सील करण्यात आला आहे. आणि त्या चहावाल्याला जोगेश्वरीच्या हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तसेच, मुख्यंमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या १६० कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, या सगळ्यांना वांद्रे (पुर्व) येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. या चहावाल्याच्या संपर्कात हे सुरक्षा रक्षक आल्याच्या शक्यतेने मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सर्व १६० जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूरत अल्पवयीन मुलाचे अपहरण करून हत्या

News Desk

जागतिक अवयवदान विशेष : औरंगाबादेत २० महिन्यांत १२ जणांचे दान

News Desk

‘मराठवाडा मुक्ती संग्रामातील’ वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

News Desk