HW News Marathi
Uncategorized

‘कुणी असो वा नसो…दादांचं मंत्रालयात काम सुरू’ मुंडेंच्या दादांना शुभेच्छा अन् मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पवारांना अनोख्या शुभेच्छा दिल्यात, एका लेखाच्या माध्यमातून अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण याच लेखात त्यांनी दादांच्या कामाचं कौतुक करताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. कुणी असो किंवा नसो, महाराष्ट्राचं अर्थचक्र चालावं म्हणून कोव्हिड काळातही दादांचं मंत्रालयातील कार्यालय सुरु असल्याचं सांगत मुंडेंचा निशाणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेला पाहायला मिळतो.

राजकारणात दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी प्रसंगी नुकसान सहन करतील, टीका आणि टोकाचा विरोध सहन करतील पण दिलेला शब्द पाळणारच, असे नेते बोटावर मोजण्याइतकेच आहेत. त्यापैकीच आवर्जून नाव घ्यावं ते अजितदादांचं! बोले तैसा चाले ही म्हण लिहिणाऱ्याने त्या काळात अजित दादांसारख्याच कुणालातरी डोळ्यासमोर ठेवून लिहिलेली असावी, याची प्रचिती मला कित्येक अनुभवातून आली आहे. माझ्या राजकीय जडणघडणीत, आज मी आहे त्या पदासहित आजवर मी जी कामे करू शकलो त्या सर्वांमध्ये दादांचे योगदान मला ती प्रचिती व अनुभूती आजवर देत आले आहे, अशा भावना धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने व्यक्त केल्या आहेत.

कोणी असो नसो, दादांचे कार्य मात्र अविरत सुरू

आम्ही मुंडे कोणत्याही कार्यक्रमाला कधी वेळेवर जात नाहीत अशी चर्चा असते, दादांच्या बाबतीत हे उलट आहे, कोणी नाही आलं तरी चालेल पण दादा कार्यक्रम, बैठक किंवा अगदी प्रचारसभा का असेना दिलेल्या वेळीच हजर होणार! बऱ्याचदा दादा लवकर आल्याने आमची तारांबळ सुद्धा होत असते.लॉकडाऊन काळात सगळं बंद असताना सकाळी 7 वाजल्यापासून रात्री उशिरा पर्यंत दादांचे मंत्रालयातील कार्यालय सुरू असायचे. स्वतः दादा बसून असायचे, महाराष्ट्राचे अर्थचक्र चालावे म्हणून कोणी असो नसो, दादांचे कार्य मात्र अविरत सुरू असायचे, धनंजय मुंडे यांच्या या बोलण्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा बोलण्याचा निशाणा दिसतोय, तर “दादांची केबिन सकाळपासून अगदी मध्यरात्री पर्यंत सुरू असते, दादांच्या अविरत कार्यशैलीची हीच ती प्रेरणा आहे जी माझ्यासारखे असंख्य तरुण राजकारणात नव्याने काम सुरू करताना शिकायचा प्रयत्न करतात!”

कोणत्याही टीकेमुळे खचतील ते पवार कसले?

दादांच्या अंगी असलेल्या स्पष्ट व सडेतोड वाणीमुळे आणि आजकाल सोशल मीडियाच्या वाढलेल्या अति वापरामुळे दादांच्या अंगी असलेल्या सकारात्मक सद्गुणांना बाजूला ठेऊन त्यांच्यावरील क्रीटीसीजमचा अधिक उदो उदो केला जातो, याचे वाईट वाटते. पण कोणत्याही टीकेमुळे खचतील ते पवार कसले माझ्यासारख्या राजकारणात व समाजकारणात काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्याला अजित दादांसारख्या माणसाची पाठराखण मिळणे ही त्यातल्या त्यात एक मोठी गोष्ट आहे. कारण ‘अनंत टीकेचे धनी’ अशीच आमच्या दोघांची ओळख अनेकवेळा माध्यमांसमोर मांडली जाते. दादांचा कामे करण्याचा धडाका, लोकांशी जनसंपर्क, प्रशासनावरील मजबूत पकड, त्यांच्यातील धैर्य आणि संयम या अशा एक ना अनेक गोष्टी सांगता येतील, ज्या मी त्यांच्याकडे बघून शिकायचा प्रयत्न करतो आहे. सबंध राज्याने कोविड काळात या गोष्टी पाहिल्या व अनुभवल्या आहेत.

आम्ही कधीच विसरणार नाही

माझ्यासारख्या अनेकांचे प्रेरणास्थान आहात, आपण करत असलेलं काम, कोरोना सारख्या महामारी मध्ये आपण राज्यातील जनतेला दिलेला आधार आम्ही कधीही विसरणार नाही, तुम्ही मंत्रालयात बसून रोज सकाळच्या सात वाजल्यापासून मध्यरात्री पर्यंत लोकांसाठी केलेलं काम आम्ही कधीच विसरणार नाही; महामारी आणि आर्थिक संकट अशा दुहेरी कात्रीत असताना देखील अत्यंत संयमाने व धैर्याने तुम्ही आम्हाला सांभाळलत आणि हे करत असताना तुमचा संवेदनशील स्वभाव थोडाही डगमगू दिला नाही म्हणूनच कदाचित ‘बोले तैसा चाले’ ही म्हण तुम्हाला तंतोतंत लागू होत असावी. पण या काळात तुम्ही स्वतःची काळजी देखील घ्या असंही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

अजितदादा पवार यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार जोपासत, दादांच्या हातून नेहमीप्रमाणेच कायम सत्कार्य घडो…. दिलेला शब्द पाळणारच याप्रमाणे आम्हा कार्यकर्त्यांना न्याय देणाऱ्या महाराष्ट्राच्या दादांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि प्रभू वैद्यनाथकडे दादांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो, असं सरतेशेवटी धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

इतक्या बारकाईने निरीक्षण करणे

प्रशासनावरील त्यांची मजबूत पकड याची वेळोवेळी अनुभूती येत असते. मागील काही दिवसांपूर्वी अजित पवार आमच्या बीड जिल्हा दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी केवळ काही किलोमीटर प्रवासात बीड शहरातील स्वच्छतेवर बोट ठेवले आणि बीडच्या मुख्याधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. दुसऱ्याच दिवशी सबंध बीड शहर चकाचक झाले. दौऱ्यात असताना इतक्या बारकाईने निरीक्षण करणे, त्याचा संदर्भ लगेच समोरच्या बैठकीत ठेऊन ते काम करवून घेणे या बाबींमुळेच कदाचित दादा आज महाराष्ट्राचे दादा आहेत! असं म्हणायलाही मुंडे विसरले नाहीत.

अजित पवार यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार जोपासत, दादांच्या हातून नेहमीप्रमाणेच कायम सत्कार्य घडो दिलेला शब्द पाळणारच याप्रमाणे आम्हा कार्यकर्त्यांना न्याय देणाऱ्या महाराष्ट्राच्या दादांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि प्रभू वैद्यनाथकडे दादांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो, अस धनंजय मुंडे म्हणालेत.

काकांच्या वाढदिवसाला पुतण्याची खास पोस्ट

रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खास इन्स्टाग्राम पोस्ट लिहिलीय. अजित पवार यांच्यासोबतचे दोन फोटो शेअर करत त्यांनी दादांविषयी वाटणाऱ्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजितदादांचा स्वभाव गुण सांगत दिलेल्या शब्दाला जागणारे, उत्तम प्रशासक आणि कामातही दादा असणारे लाडके नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, दादांना निरोगी आणि दुर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना या पोस्टच्या माध्यमातून रोहित पवार यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट विभागाची यादी

News Desk

मुंबई काँग्रेसला बुडवण्यासाठी निरूपम यांचा हातभार

News Desk

हे’ ठेकेदारांचे राज्यकर्ते आहेत की शेतकऱ्यांचे? आदित्य ठाकरेंचा सवाल

News Desk