HW News Marathi
Uncategorized

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात, राहुल गांधी देणार अध्यक्ष पदाचा राजीनामा ?

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपला स्पष्ट बहुमत मिळावत वर्चस्व सिद्ध केले आहे. काँग्रेसचा निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. यानंतर आज (२५ मे) काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू झाली आहे. राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात चौकीदार चोर है चा नारा दिला होता. त्याला मोदींकडून मै भी चौकीदारचा नारा देण्यात आला. त्यामुळे राहुल यांची रणनीती फेल ठरली अशी चर्चा रंगली आहे.

राहुल गांधी यांनी निवडणुकीत काँग्रेसचा अत्यंत मेहनतीने प्रचार केला. परंतु त्यांच्या भाषणांमधून अनेक मुद्दे पुन्हा पुन्हा सांगितले गेले. जे लोकांच्या पसंतीस उतरले नाहीत. एवढेच नाही तर पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये जो हवाई हल्ला करून प्रत्युत्तर देण्यात आले त्याचा सर्वाधिक फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि पर्यायाने भाजपला झाला.

निवडणुकीत उत्तर प्रदेश फक्त एकच जागा मिळाल्याने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत त्यांच्या पदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठविला आहे. बब्बर पाठोपाठ अमेठीत राहुल गांधी यांच्या पराभवनंतर येथील जिल्हा अध्यक्ष योगेश मिश्रा यांनी देखील त्यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठविला आहे.

तसेच ओडिशात विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशाचे कामगिरीनंतर प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनायक यांनी राजीनामा आहे. युपीएच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, युपीए अध्यक्ष सोनिया गांधी, पूर्व उत्तर प्रदेश महासिचव प्रियांका गांधी वाड्रा, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, मल्लिका अर्जुन खरगे, गुलाम नवी आझाद आदी दिग्गज नेते उपस्थित आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘नाणार’ प्रकल्प रद्द केल्यामुळे प्रमोद जठार देणार भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

News Desk

स्पॅनिश अभिनेत्री राहुलच्या प्रेमात

News Desk

“काल परवाच नवाब मलिकांचे पुतळे जाळण्याचा कार्यक्रम आपण दिला”, चंद्रकांत पाटलांच वादग्रस्त वक्तव्य!

News Desk