HW News Marathi
राजकारण

“राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल,” फडणवीसांचा पुन्हा एकदा दावा

मुंबई | “राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. सध्या फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहे. “सर्वोच्च न्यायालयाने मंत्रिमंडळ विस्तार (Expansion of Cabinet) करू नका. असे कुठेही म्हटले नाही,” या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी सरकारच्या मंत्रिमंडळावर आज (7 ऑगस्ट) माध्यमांशी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कालच मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, विस्तार लवकरच होईल. मी त्या पलिकडे जाऊनही तुम्हाला सांगतो. तुम्ही विचार करताय त्यापेक्षाही लवकर होईल.” सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्ताराला विलंब होत आहे का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर फडणवीस पुढे म्हणाले, “मला असे वाटते की, सर्वोच्च न्यायालयाने मंत्रिमंडळ विस्तार करू नका. असे कुठेही म्हटले नाही. त्या सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराता काही संबंध नाही. म्हणूनच मी सांगितले की, आम्ही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करणार आहोत. आणि तुम्ही लोक विचार करताय, त्याच्या आधीही आम्ही करू.”

सचिवालयाकडे दिले आहेत, यामुळे सरकारव टीका होतेय. याआधी सचिवालय होते आता ते मंत्रालय झाले. आता मंत्रिलयाचे सचिवालय झाले, पत्रकारांच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “जेव्हा माहिती असताना देखील राजकाराणा करता डॉयलगबाजी केली जाते. गेल्या सरकारमध्ये अनेक सचिवांना हे अधिकार होते. त्याआधी आमच्या सरकारमध्ये अनेक मंत्र्यांनी सचिवांना अधिकार दिले होते. ही महाराष्ट्रात नव्हे तर देशात परंपरा आहे. सरकार जनतेचे आहे. जनतेचे मुख्यमंत्री आहेत. मी त्यांच्यासोबत कॅबिनेटमध्ये आहेत. जनतेचे लोकच महाराष्ट्रमध्ये निर्णय घेतील.”

उत्तर देण्याऐवढा रिकामटेकडा मी नाही

फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने तुमचे जुने मित्र उद्धव ठाकरे किंवा शिंदे गटांनी एकत्र यावे, यावर तुम्हाला कसे बघताया? यावर फडणवीस म्हणाले, “कोण काय म्हणतय याला राजकारणात महत्व नसते. परिस्थिती काय आहे, याला राजकारणात महत्व असते. हा काय बोला, तो काय बोलया, त्यावर उत्तर देण्याऐवढा रिकामटेकडा मी नाही.”

 

Related posts

सत्ता नको, मला विरोधी पक्ष व्हायचंय !

Gauri Tilekar

तब्बल २३ तासांनी लागला निकाल, भाजपचे डावखरे विजयी

News Desk

यंदाच्या दिवाळीत एक दिवा श्रीरामाच्या नावाने पेटवा !

Gauri Tilekar