नवी दिल्ली | राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चिन्हे दिसत आहे. तर दुसऱ्या बाजुला राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकासान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२० नोव्हेंबर) भेट घेतली. संसद भवनातील मोदींच्या कार्यालयात पवारांची भेट झाली. मोदी आणि पवारांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली. “या भेटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली, राजकीय परिस्थितीवर नाही,” अशी माहिती पवारांनी बैठक संपल्यानंतर दिली.
During my meeting with @PMOIndia today, I invited him to inaugurate a three day conference & exhibition at Vasantdada Sugar Institute from 31st Jan to 2nd Feb 2020. The theme of the conference is 'Sustaiability – Innovation & diversification in sugar and allied industry. pic.twitter.com/AHOsGwlkHv
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 20, 2019
तसेच पवारांनी मोदीसोत झालेल्या बैठकीत शेतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या पाच मुद्य्यावर चर्चा केली. मोदीसोबत चर्चा झालेल्या मुद्यांची माहिती पवारांनी ट्वीट करत दिली आहे. यात पवारांनी राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाकडे मोदींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, केंद्र सरकारकडून लवकरात लवकर मदत देण्याची मागणी केली. यंदा अवकाळी पावसाने राज्यातील ३२५ तालुक्यातील ५४.२२ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी मी नोव्हेंबरच्या सुरुवातीला नाशिक आणि विदर्भाचा दौरा केला, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी बोललो, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. परतीच्या पावसामुळे राज्यातील जवळपास सर्वच उभे पीक आडवे झाले. पंतप्रधानांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले.
पवार आणि मोदींमध्ये या पाच मुद्द्यांवर झाल्या चर्चा
१) नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष, ज्वारी, टोमेटो, सोयाबीन, कांदा, फळबाग आणि भाजीपाला आदी पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
२) नाशिक जिल्हा हा द्राक्षाच्या शेतीसाठी प्रसिद्ध असून अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात द्राक्षाच्या शेतीचे नुकसान झाले आहे.
३) नाशिक जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यात जवळपास ४४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहेत.
४) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खरीप पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार रुपयांची तर फळबागांसाठी हेक्टरी १८ हजारांची मदत जाहीर केलेली मदत ही तुटपुजी असल्याचे पवारांनी म्हटले आहे. मात्र, मी कृषीमंत्री २०१२-१३च्या कार्यकाळात देखील असा तेव्हाच्या तात्कालीन सरकारने प्रति हेक्टरी ३०, हजार रुपये देण्यात आले होते. राज्यपालांनी दिलेली रक्कम ही कमी असून केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याचे मागणी पवारांनी केली.
५) अवककाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या सर्व पिकांचे नुकासन झाले असून शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. मात्र, आता शेतकरी घेतलेले कर्जाची परत फेड करण्यासाठी त्यांच्या कडे पैसे देखील शिल्लक राहिले नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमाफी द्यावे अशी मागणी देखील पवारांनी मोदींकडे केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.