मुंबई | “एकनाथ शिंदे हे आमचे जिवाभावाचे सहकारी आहेत. कडव निष्ठवंत शिवसैनिक आहेत. ऐवढेच मी सांगू शकतो,” असे म्हणत संजय राऊत यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बोलणे टाळले. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल आहेत. विधान परिषदेत शिवसेनेची मते फुटल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. एकनाथ शिंदे हे काल (20 जून) रात्रीपासून नॉट रिचेबल आहेत. परंतु, “एकनाथ शिंदेचे अजूनपर्यंत बोलणे झालेले नाही,” असेही राऊतांनी आज (21 जून) माध्यमांशी बोलताना म्हणण्या केले आहे.
एकनाथ शिंदे नाराज आहे, याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारलेल्या राऊत म्हणाले, “मला असे वाटत नाही. एकनाथ शिंदे हे कालपर्यंत आमच्याबरोबर होते वेस्ट इन हॉटेलमध्ये होते. शिवसेनेचे उमदेवार विजयी व्हावा. यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत होते.आणि बाहेरच्या मतदानाशी ते संपर्क करत होते. एकनाथ शिंदे हे आमचे जीवाभावाचे सहकारी आहेत. कडव निष्ठवंत शिवसैनिक आहेत. ऐवढेच मी सांगू शकतो. त्यामुळे त्यांच्याबाबती आज जे बोलले जाते. जोपर्यंत त्यांचे आमचे बोलणे होत नाही. तोपर्यंत त्यांच्याविषयी कोणतेही विधान आणि भूमिका घेणार नाही.”
Some MLAs of Shiv Sena and Eknath Shinde are currently not reachable. Efforts are being made to topple the MVA government but BJP has to remember that Maharashtra is very different from Rajasthan or Madhya Pradesh: Shiv Sena leader Sanjay Raut pic.twitter.com/cDUFjfm9pf
— ANI (@ANI) June 21, 2022
महाराष्ट्राच्या छातीवर घाव घालता येणार नाही
राऊत म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये राज्यस्थान आणि मध्य प्रदेश पॅर्टनप्रमाणे उद्धव ठाकरेंचे सरकार पाडावे. अशा प्रकारचे एक हालचाल गेल्याकाही दिवसांपासून सुरू आहे. पण मध्य प्रदेश आणि राज्यस्थान पॅर्टन हा महाराष्ट्रात चालणार नाही. त्यांचे प्रयत्न नक्की सुरू आहे. या पद्धतीने तुम्हाला किंगमेकर होता येणार नाही. या पद्धतीने महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही. आणि या पद्धतीने तुम्हाला महाराष्ट्राच्या छातीवर घाव घालता येणार नाही. शिवसेनेवर घाव घालने म्हणजे महाराष्ट्र दुबळा करणे आपण पाहिले असेल. मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष आहेत मंगल प्रभात लोढा त्यांनी कालच्या विधान परिषदेच्या निकालानंतर मुंबईवर ताबा मिळवण्याची भाषा केली आहे. यांची पावले कोणत्या दिशेने पडत आहे हे समजून घ्या. आता मुंबईवर ताबा मिळवू, मुंबईवर विजय मिळवू म्हणजे काय?, यासाठी तुम्ही फाटा फुट घडवून आणत आहात का?, मुंबईवर विजय मिळवण्यासाठी आधी शिवसेनेला कमजोर केली पाहिजे. शिवसेना दुबळी केली पाहिजे. हे फार मोठे कारस्थान आणि षडयंत्र आहे. आशा प्रकारचे भाकीत आम्ही आधी सुद्धा केले आहे. आणि शिवसेनेमध्ये आईचे दुध विकणारी औलाद निर्माण होणार नाही. हे जे माननीय उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या वर्धापन दिनी सांगितले होते. हे सुद्धा तुम्ही समजून घेतले पाहिजे. शिवसेना ही निष्ठावंताची सेना आहे. सत्तेसाठी आणि पदासाठी स्वत: ला विकणारे, महाराष्ट्रच्या पाठीत खंजीर घुपसणारी औलाद शिवसेनेत कधी निर्माण होणार नाही.”
संबंधित बातम्या
विधान परिषदेच्या निकालानंतर ‘मविआ’मध्ये मोठा स्फोट; शिवसेनेचे एकनाथ शिंदे नॉट रिचेबल
एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे नॉट रिचेबल आमदार गुजरातमधील मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्कामी
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.