HW News Marathi
Uncategorized

ट्रम्पच्या मुलीमुळे हैदराबादचे भिकारी हवालदिल

हैदराबाद: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प या महिन्याअखेरीस हैदराबाद दौ-यावर येणार आहे. या वेळी हैदराबादच्या रस्त्यावर भिकाºयांना येणा-या बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी आतापासून भिका-यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यावर भिकारी दिसल्यास त्याला थेट जेलमध्ये टाकले जात असल्याने समस्त भिकारी हवालदिल झाल्याचे वृत्त आहे.

इवांका ट्रम्प २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान जागतिक उद्योजक शिखर परिषदेसाठी भारतात येणार आहे. यानंतर शहरात १५ डिसेंबरपासून विश्व तमीळ संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणाºया या संमेलनात हजारो एनआरआय शहराला भेट देणार आहेत. आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार शहरातील सार्वजनिक ठिकाणी आणि चौकांमध्ये भीक मागणे किंवा लहान मुले अथवा अपंगांकडून भीक मागवून घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ८ नोव्हेंबर ते ७ जानेवारीपर्यंत या कालावधीत ही बंदी लागू असेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोहित पवारांनी औरंगाबाद घटनेतील मजूरांना वाहिली श्रद्धांजली

News Desk

येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता

News Desk

४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी,सहा मराठी चित्रपटांची निवड

News Desk