HW News Marathi
Uncategorized

अदानी एअरपोर्ट नावाचा फलक तोडल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया!

मुंबई । मुंबई विमानतळावर अदानी एअरपोर्ट असा बोर्ड लावल्याने शिवसेना आक्रमक झाले आहेत. अदानी एअरपोर्ट असा बोर्ड दिसताचं शिवसैनिकांनी बोर्ड तोडल्यानंतर शिवसैनिकांनी याठिकाणी नारेबाजी देखील केली. तर सकाळपासून या ठिकाणी गोंधळ सुरू होता. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता पहिली प्रतिक्रिया देत, महाराजांच्या नावाने विमानतळ ओळखलं जाईल, याची व्यवस्था आम्ही केली आहे असं म्हटलं आहे.

ते शिवसेनेला मान्य नाही

उद्योगपतींच्या नावाने विमानतळ ओळखलं जाणार असेल तर नक्कीचं ते शिवसेनेला मान्य नाही. महाराष्ट्राला मान्य नाही आणि देशालाही मान्य नाही. ते छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ या नावानेचं ओळखलं जायला हवं आणि ते जाईल, याची व्यवस्था देखील शिवसेना केल्या शिवाय राहणार नाही. असं राऊत म्हणाले आहे.

शिवसैनिकांनी घातला राडा

आज सकाळपासून शिवसैनिक आक्रमक झाले आहे आहेत. मुंबई एअरपोर्टला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं आहे. तिथे महाराजांचं नाव असंल पाहिजे. याठिकाणी अदानी एअरपोर्ट असं नाव दिलं आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी ते तोडलं आहे. अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली आहे.

मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर शिवसैनिकांनी अदानी नामफलकाची तोडफोड केली आहे. विमानतळाचे संचालन अदानी ग्रुपच्या हाती गेल्यानंतर ‘अदानी एअरपोर्ट’ अशा पाट्या विमानतळ परिसरात लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी या बोर्डची तोडफोड केली आहे. व्हीआयपी गेट नंबर 8 आणि विलेपार्ले हायवेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरील बोर्ड शिवसैनिकांनी लाठ्यांनी तोडला.

शिवाजी महाराजांच्या नावाचा विसर पडला का?

अदानी कंपनीने आंतराष्ट्रीय विमानतळाचा ताबा घेतल्यावर तिथला फलक बदलण्यात आला आहे. याचाच विरोध करत शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.अदानी कंपनीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा विसर पडला का? असा प्रश्न विचारला आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. मात्र तिथे अदानी विमानतळ असे लावलेले बोर्ड अजिबात सहन केले जाणार नाहीत, असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. जीवीके प्रमाणे ‘मॅनेज्ड बाय अडानी एयरपोर्ट’ असा बोर्ड ठेवण्याची सूचना शिवसेनेने केली आहे. अन्यथा जिथे फलक दिसेल, तिथे तोडफोड करण्याचा सेना नेत्यांनी इशारा दिला आहे.

शिवसेनेकडून नाराजी जाहीर करण्यात आली

मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाचं नाव अदानी केल्याने शिवसैनिकांनी तिथे जाऊन तोडफोड केली आहे. मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा १३ जुलैला अदानींकडे देण्यात आला आहे. यानंतर मुंबई विमानतळावर आणि बाहेर दोन्ही ठिकाणी अदानी विमानतळ असे नामफलक लावण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असणाऱ्या विमानतळावर अदानींच्या नावे नामफलक लावण्यात आल्याने शिवसेनेकडून नाराजी जाहीर करण्यात आली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर नाराजी बोलून दाखवली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहेच शिवाय हतबलही झालेय – नवाब मलिक

News Desk

समाजाला अनिश्चित काळासाठी बंद करुन ठेवणार का? चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीला सवाल!

Ruchita Chowdhary

जालन्यातील तरुण-तरुणीच्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल, ६ आरोपी अटकेत

swarit