मुंबई | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि या गाडीचे मूळ मालक मनसुख हिरेन यांचा धक्कादायक पद्धतीने झालेला मृत्यू यामुळे राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मोठी खळबळ उडाली आहे. NIA कडून तपासात मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. या संपूर्ण प्रकरणात तपास अधिकारी सचिन वाझे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. मात्र, याच सचिन वाझे यांची काहीच दिवसांपूर्वी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठराखण केली होती. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील हाच प्रयत्न केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे.
संजय वाझे प्रकरणी शिवसेनेने एकंदर घेतलेली भूमिकेवर संजय निरुपम यांनी ट्विट करून म्हटले आहे की, “सचिन वाझे याला पोलीस दलात पुन्हा घेण्याबाबत मी सांगितले होते कि अडचणी येतील. मात्र, कालपर्यंत संजय राऊत हे वाझे प्रामाणिक आणि सक्षम अधिकारी आहेत असे म्हणत होते. कोणत्या नेत्याच्या खांद्यावरून सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत आणण्यात आले ? हा प्रश्न आहे. म्हणूनच NIA ने आता संजय राऊत यांच्यासारख्या बकबक करणाऱ्यांना उचलून सचिन वाझेंवर वरदहस्त ठेवणाऱ्या नेत्यापर्यंत पोहचले पाहिजे”, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत काय म्हणाले होते ?
सचिन वाझेंबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले होते कि, “कोणताही अधिकारी वाईट नसतो. त्याला आजूबाजूची परिस्थिती वाईट बनवत असते. ज्या पद्धतीने हे प्रकरण घडले आहे कदाचित त्यावर कुणाचे नियंत्रण राहिले नसेल. या प्रकरणातून अनेक मंत्र्यांना देखील धडा मिळाला असेल.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.