HW News Marathi
Uncategorized

आता सेल्फी विथ काऊ

कोलकाता: अनेक जण सेल्फी काढून फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप यांसारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर अपलोड करतात. याच क्रेझचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल, या हेतूने एका सामाजिक संस्थेने ‘सेल्फी विथ काऊ’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. वैज्ञानिक आणि सामाजिक दृष्ट्या गोरक्षण आणि गायीचे महत्त्व याबाबत लोकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. गो सेवा परिवार या सामाजिक संस्थेने ‘सेल्फी विथ काऊ’ आणि ‘काऊफी’ या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. आतापर्यंत या स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. गोरक्षण हा मुद्दा धर्म आणि राजकारणाशी जोडता कामा नये. सामाजिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून त्याकडे पाहिले पाहिजे. गोमूत्र, दूध आणि शेण आदींपासून वैज्ञानिक सिद्धता दर्शवणारे अनेक प्रयोग यशस्वी झाले आहेत, असे संस्थेचे पदाधिकारी अभिषेक प्रताप सिंह यांनी सांगितले. या स्पर्धांमुळे लोकांमध्ये गायीचे महत्त्व आणि गोरक्षण याबाबत जागृती होईल, असेही ते म्हणाले. याआधीही या संस्थेने अशा प्रकारची मोहीम राबवली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Maratha Reservation , Chief Minister and Vitthal | मराठा आरक्षण,मुख्यमंत्री आणि विठ्ठल …!

News Desk

मतदाना दिवशी जनताच भाजपला शॉक देणार, मोदीजी काळ्या पैशाचं काय झालं ?

News Desk

पेट,नेट,सेट,गेट ,एम.फिलसह संशोधक विद्यार्थ्यांची ४ व ५ मे रोजी विद्यापीठीत बैठक  

News Desk
महाराष्ट्र

तारापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरात तोडफोड

News Desk

पालघर | तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात भरती प्रक्रियेत डावल्यामुळे स्थानिकांनी प्रकल्पाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची तोडफोड केली. या प्रकल्पात भूमीपुत्रांना नोकरी देण्याचे आश्वासन देऊनही त्यांना भरतीपासून दूर ठेवल्याचा आरोप स्थानिकांनी करुन वाहनांची तोडफोड केली आहे.

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात सध्या भरती प्रकिया सुरू झाली आहे. या स्थानिक तरुणांनी नोकरीसाठी कॉल केले होते. परंतु भरतीसाठी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना डावलून बाहेरील लोकांना या भरती प्रक्रियेत प्राधांन्य देत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.

यासाठी स्थानिक रस्त्यावर उतरुन, प्रकल्पासाठी जाणाऱ्या वाहनांना अडवीत आहेत. या व्यतिरीक्त बसच्या काचाही फोडल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून येथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Related posts

पुणे मनपा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या पूजा कोद्रे विजय

News Desk

अजित पवार यांनी तिसऱ्यांदा घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

News Desk

मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला भीषण आग, दुकान जळून खाक

News Desk