HW Marathi
Uncategorized महाराष्ट्र राजकारण

फोन टॅपिंग मानसिक विकृती, आव्हाडांचा भाजपवर निशाणा

मुंबई | फोन टॅपिंग ही मानसिक विकृती आहे, फोन टॅपिंगवरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड भाजपवर टीकास्त्र सोडले. आव्हाड पुढे म्हणाले, “फोन टॅपिंगबाबात कॅबिनेटमध्ये नोट आली होती, असा खुलासाही आव्हाडांनी आज (२४ जानेवारी) आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे. कोरेगाव-भीमा हिंसा हा कट, या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

“फोन टॅप होत आहेत, हे मला आधीच माहिती होते”, अशी ग्वाही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. राऊत पुढे म्हणाले की, “भाजप राज्यातील विरोधकांचे फोन टॅप होते होते. हे मला अधीच माहिती होते. परंतु मी फोन टॅपिंगला गांभीर्याने घेतली नाही. विरोधकांवर पाळत ठेवणे हे राजकारण नाही, असे बोलून भाजवपर निशाणा साधला. तसेच  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन टॉप होत,” अशी माहिती राऊतांनी माध्यमांना दिली.

 

 

Related posts

Chhattisgarh Assembly Elections 2018 : पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

News Desk

भिमा कोरेगावचे पडसाद उल्हासनगरात . संपुर्ण शहर बंद .

News Desk

आॅक्सिजन अभावी जवानाचा मृत्यू

News Desk