HW News Marathi
Uncategorized

दंगल किंवा युद्ध करून भाजपचा निवडणुका जिंकण्याचा डाव- राज ठाकरे यांची टीका

मुंबई: केंद्रातील मोदी सरकारलाही विरोधकांची गरज नसून ते स्वत:च्या चुकांमुळे खड्ड्यात जातील, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. गुजरातच्या निवडणुकीनंतर देशात विरोधी पक्ष प्रबळ होतील, असाही दावा त्यांनी केला आहे. नोटाबंदी, बुलेट ट्रेन, गुजरात निवडणूक, सोशल मीडियाचा वापर अशा विविध मुद्यावरून त्यांनी भाजपवर घणाघात केला. गुजरातमध्ये विकास झालेला भागच मला दाखवला गेला. अविकसित गुजरात मला दाखवलाच नाही. हा भाग आता समोर येत आहे, असे त्यांनी सांगितले. राजकारणातील २५ वर्षांच्या काळात एवढी भाषणं देणारे आणि निवडणुकांच्या प्रचारात इतके सक्रीय असणारे पंतप्रधान मी पहिल्यांदाच बघितले, असा चिमटाही त्यांनी काढला.

दाखवण्यासारखे आणि सांगण्यासारखे काही उरले नाही, म्हणून ताजमहालसारखे मुद्दे समोर येतात, असे सांगत त्यांनी भाजपवर टीका केली.

नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय का घेतला हे मला अजूनही समजत नाही. आधी तुम्ही इंजिन बंद केले आणि आता तुम्ही धक्का मारायला सांगत आहात. फक्त ४०० कोटी रुपयांसाठी तुम्ही नोटाबंदी केली का? असा सवाल त्यांनी विचारला. सर्वसामान्य जनतकडे पैसे नाही, पण भाजप हा सर्वात श्रीमंत पक्ष झाला, असा चिमटाही त्यांनी काढला.जगभरात मंदी होती, त्यावेळी मनमोहन सिंग यांनी देशाला सावरले होते. मोदी सरकारला काळा पैसा बाहेर काढायचा होता तर त्यांच्याकडे वेगळे पर्यायदेखील होते. सध्या देशाची उर्जा अर्थव्यवस्थेला सावरण्यात खर्ची पडत असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. भाजपने २०१९ च्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. दाऊदला भारतात परत आणून निवडणुकीत विजय मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. जर दाऊदच्या घरवापसीत अपयश आले तर दंगल किंवा कारगिलसारखे युद्ध करून निवडणुकीत बाजी मारण्याचा भाजपचा डाव आहे, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वेडा खेळ.. एकुलत्या एक मुलाचा घेतला बळी

News Desk

BJP कडून Narayan Rane यांचे ‘Mission 144’… होणार का फत्ते?

News Desk

#NirbhayaCase : दोषी विनय शर्माच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या होणार सुनावणी

swarit