HW News Marathi
Uncategorized

“मवाळपणा माझ्या रक्तात नाही” – नारायण राणे

रायगड। नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान रायगडच्या महाड येथे पत्रकारांशी बोलताना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना,केलेल्या खळबळजनक वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अक्षरशा ढवळून निघालं. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद कोकणापासून ते दिल्लीपर्यंत दिसून आले. शिवनसेनेने आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरून आंदोलनं केली. शिवाय, राणेंवर अटकेची कारवाई देखील झाली व मात्र त्यांना महाड कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर त्यांची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या खास शैलीत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी, “आपण कारवाईनंतर मवाळ झालोय असं काहीजण म्हणत आहेत, पण मी त्यांना सांगू इच्छितो की मवाळपणा माझ्या रक्ततात नाही, आपल्या जीवाची पर्वा न करता, समोरच्यावर तुटून पडणं हा माझा स्वभाव गुणच आहे.” असं देखील बोलून दाखवलं.

मी कधी खचून वैगरे जात नाही

नारायण राणे म्हणाले, “माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले, शिवसेनेत असतानाही आले विरोधकांकडून आणि आता शिवसेना सोडल्यावर शिवसेनेकडून असे अनेक प्रकार घडता आहेत. मी कधी खचून वैगरे जात नाही. माझं खच्चीकरण मी होऊ देत नाही. म्हणून प्रत्येकाला तेव्हाही अगदी घटना घडायच्या अगोदरही मी लोकांना भेटत होतो. लोकं मला भेटत होते, लोकांचा प्रतिसाद उत्तम होता आणि त्यानंतरही मी कोकणात आलो, कोकणातील जनतेकडून एवढ्या मोठ्याप्रमाणावर मिळालेला प्रतिसाद पाहून मी भारावून गेलोय.

विरोधकांशी लढलो शिवसेनेत असताना

कणकवली व काल सावंतवाडीत रात्री १२ वाजता देखील, हजारोंच्या संख्येने लोकं उपस्थित होती. रात्रीचे १२ वाजले तरी देखील ते मैदान पूर्णपणे भरलेलं होतं. याचाच अर्थ जनतेचं प्रेम किती आहे. जनता मला कशाप्रकारे प्रतिसाद देते आहे, हे कळतं आणि काहीजण म्हणतात कारवाई केल्यानंतर राणे मवाळ झाले. मी त्यांना सांगू इच्छितो की मवाळपणा माझ्या रक्ततात नाही. मी अनेक लोकांशी लढलो, शिवसेनेच्या विरोधकांशी लढलो शिवसेनेत असताना. आज जे संरक्षण मिळालेलं आहे ते १९९१ पासून माझ्याकडे संरक्षण आहे.”

काय म्हणाले होते अजित पवार?

“सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे?. निधी द्यायचं बोललं तर गडकरी साहेबाचं मंत्रालय देऊ शकतं. गडकरी साहेबांनी यापूर्वी निधी दिला आहे. काम पण चालली आहेत. या खात्याचं पूर्वी नाव अवजड खातं होतं. काही लोकं त्याला गंमतीने अवघड खातंही म्हणायचे. आता त्याच्या नावात काही बदल झाले आहेत. आता करोनाचं संकट आल्याने सुक्ष्म आणि लघू खूप सारे उद्योग अडचणीत आले आहेत. देशातील छोट्या उद्योगांसाठी एखादा निर्णय घेत येत असावा, असं वाटतं”, असं टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Karuna Sharma केसमध्ये बीड पोलिसांची थेट मुंबईकडे झेप, Sharma यांना जामीन मिळणार ?

News Desk

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत शिवसेनेचं मोठं विधान, शिवसेना काँग्रेसच्या वाटेवर!

News Desk

धक्कादायक! न्युयॉर्कमधील प्राणीसंग्राहलयात ४ वर्षाच्या वाघिणीला कोरोनाची लागण

News Desk