HW News Marathi
Uncategorized

सेक्स शारिरीक नव्हे मानसिक समस्या…

मुंबई- सेक्सविषयी सर्वांनाच कमालीचे आकर्षण असते. सेक्ससंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी विविध पॉर्न साइट सर्च केल्या जातात. व्हिज्युअल इफेक्ट वापरून ग्राहकांना तासनतास खिळवून ठेवण्याचे कसब या साइटने मिळवलेले आहे. यातून त्यांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो. सध्या हा नफा कित्येक हजार कोटींच्या घरात गेला आहे. याच्यासोबत सेक्स समस्या व त्यावरील औषधांचीही जाहिरातबाजी केली जाते. त्यातून काही कंपन्या कोट्यवधींची माया कमावत आहेत. परंतु सेक्ससंबंधीची औषधे खरच उपयुक्त असतात का, याचा मात्र कोणीही विचार करताना दिसत नाही.

भारतीयांना सेक्स विषयाची मोठी आवड आहे. गोरा रंग, आकर्षक बांधा, लिंगाचा आकार आदींची विशेष आकर्षण वाटते. त्यासाठी पॉर्न साइट सर्च केल्या जातात. पॉर्न पाहून काहीजण आपल्या अवयवाची तुलना करतात. त्यातून नैराश्य येते. हे नैराश्य दूर करण्यासाठी याच साइट्सवर पर्याय ठेवलेले असतात. अमूक औषधे घ्या, सहा महिने कोर्स पूर्ण करा, तुमच्या समस्या दूर होतील. अशा जाहिरातींना भूरळून अनेकजण औषध खरेदी करतात. परंतु त्यांची समस्या काही केल्या दूर होत होत नाही. मग अशी औषधे कशासाठी विकली जातात. असा प्रश्न पडतो. याचे उत्तर म्हणजे तुमची समस्या ओळखून तुम्हाला लुटण्यासाठी काही कंपन्या बनावट औषधे विकत असतात. त्यातून त्यांना कोट्यवधींची माया मिळते. हाच त्यांचा खरा उद्देश असतो. मग यातून मार्ग काय असा प्रश्न पडतो. त्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे आपले मानसिकता बदलणे.

अनेकजण हस्तमैथुन, स्वप्नदोष, शीघ्रपतन, कमजोरी आदी समस्या दूर करण्यासाठी इंटरनेट साइटवर सर्च करून औषधे खरेदी करतात. परंतु अशी औषधे घेऊन कुणालाही फायदा झाल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे सेक्स ही समस्या नसून मानसिक आजार असल्याचे काही तज्ञ्ज सांगतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ST कडून रत्नागिरी जिल्ह्यातील ८६ रोजंदारी कर्मचाऱ्याचं निलंबन

News Desk

बाबा राम रहिमच्या दराबारात राखी सावंतही…

News Desk

योजना, उद्दीष्टांच्या अंमलबजावणी नियोजन करा – खा.अशोक चव्हाण

News Desk