प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची इंदापूरमध्ये सभा पार पडली.यावेळी बोलताना शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपप्रवेशावर भाष्य केले. हर्षवर्धन पाटील यांना मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. शंकरराव भाऊंनी काँग्रेसचा विचार सोडला नाही आणि हे थेट भाजपमध्ये गेले. जो माणूस थांबायला तयार होता, त्याच्यावर कधीही अन्याय झाला नसता, हर्षवर्धन पाटील हे स्वखुशीनेचं भाजपात गेले असल्याचं त्यांनी सांगितले.पुढे बोलताना पवार यांनी ‘हर्षवर्धन पाटील जाताना म्हणाले की माझ्यावर अन्याय झाला. इंदापूरच्या जागेबाबत माझ्याशी चर्चा केली होती. आपण, यातून मार्ग काढू असे मी त्यांना म्हणालो होतो. मी दत्तात्रय भरणे यांच्याशीही बोललो होतो. भरणेही थांबतो म्हणाले होते, असे म्हणत हर्षवर्धन पाटलांनाच भाजपात जायचे होते असं पवार म्हणाले आहेत.#SharadPawar #HarshwardhanPatil #DattatrayBharne #NCP #BJP #Munde
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.