HW News Marathi
Uncategorized

सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवार आज घेणार सोनिया गांधींची भेट

नवी दिल्ली | राज्यात सरकार स्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. शरद पवार आज (१८ नोव्हेंबर) सायंकाळी ५ वाजता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या निवासस्थान भेट घेणार आहेत. शरद पवार हे सोनिया गांधी यांची भेट घेऊन शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय सिमितेने तयार केलेल्या किमान समान कार्याक्रमावर चर्चा करणार आहे. यावेळी राज्यातील सत्त स्थापनेच्या नव्या फॉर्म्युला निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नुकतीच राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी मोदीबागेत ही बैठक झाली. राष्ट्रवादीच्या या बैठकीत जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांसह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. पुण्यात झालेल्या या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली.

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात १७,१८,१९ नोव्हेंबरला सलग ३ दिवस मॅरेथॉन बैठका आयोजित करण्यात आल्याचीही माहिती मिळाली होती. मात्र, १७ नोव्हेंबरला होणारी बैठक रद्द करण्यात आली. त्याऐवजी आज याबाबतची बैठक होणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बच्चू कडूंमुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये संघर्ष पेटणार?

Manasi Devkar

आम्हाला वाटलं मोदी चुल पेटवण्याबद्दल बोलतील, पण…

News Desk

देशात ६० वर्षांमध्ये काँग्रेसनं काय केलं?, भास्कर जाधवांनी केली मोदींची मिमिक्री

News Desk