पुणे | ‘मी दाऊद इब्राहिमला पाहिले असून, त्यांच्याशी बोललोय, इतकेच नाही त्याला मी दमसुद्धा दिला आहे’, असा खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात एक वृत्त वाहिनीच्या मुलाखतीत म्हणाले आहे. संजय राऊत मुलाखतीत म्हणाले की, ”एकेकाळी मुंबईत अंडरवर्ल्डचा बोलबाला होता. आता अंडरवर्ल्डचे अस्तित्व काहीच राहिले नाही, आधी कोण मुख्यमंत्री होणार, कोण सरकारमध्ये येणार हे अंडरवर्ल्ड ठरवायचे. अशा त्या काळात मी अंडरवर्ल्डच्या अनेक लोकांना पाहिलेय. मी दाऊदपासून सगळ्यांचे फोटो काढले आहेत. आज भारतात दाऊद इब्राहिमला पाहणारे त्यात्याशी बोललेले फार कमी लोक आहेत. मात्र मी दाऊदला पाहिलेय, त्याच्याशी बोललोल. एकवेळ तर त्याला दमसुद्धा दिला होता.”
Sanjay Raut, Shiv Sena: There was a time when Dawood Ibrahim, Chhota Shakeel, Sharad Shetty used to decide who would be Police Commissioner of Mumbai & who would sit in 'Mantralaya'. Indira Gandhi used to go and meet Karim Lala. We've seen that underworld, now it's just 'chillar' pic.twitter.com/aLC6KoujRZ
— ANI (@ANI) January 15, 2020
”एकेकाळी मुंबईत अंडरवर्ल्डचा बोलबाला होता. आता अंडरवर्ल्ड काहीच राहिलेले नाही. तेव्हाच्या काळातील अडरवर्ल्ड काय होते हो आम्ही पाहिलेले आहे. त्या काळात मुंबईचे अंडरवर्ल्ड हे शिकागोच्या अंडरवर्ल्डपेक्षा अधिक गंभीर होते. त्या काळात गुंडाला भेटायला अख्खे मंत्रालय खाली येत होते. करीम लालाला भेटण्यासाठी इंदिरा गांधीही आल्या होत्या. लोक मला एकेकाळी गुंड म्हणत असत. चांगले आहे. गुंड म्हणजे चांगले काम करणारा माणूस. ऐसा पुत्र व्हावा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा”, असे म्हणताच उपस्थितांनी राऊतांच्या वक्तव्याचे स्वागत करत टाळ्यांनी वाजविल्या.
राऊत म्हणाले की, ”माणसामध्ये हिंमत असली की समोर प्रधानमंत्री, गृहमंत्री असले तरी फरक पडत नाही. आतापर्यंतच्या आयुष्यात मी मृत्यूला आणि तुरुंगाला कधी घाबरलो नाही. मी दाऊद इब्राहिमला अनेकवेळा पाहिले आहे. त्याच्याशी बोललो आहे. मी त्याला एकदा दमदेखील भरला. मी पूर्वी मारामाऱ्यादेखील करायचो, त्यावर बाळासाहेबांचे बारीक लक्ष होते, तोच माझा यूएसपी होता.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.