HW News Marathi
Uncategorized

स्वाइन फ्ल्युने घेतले १०४९ बळी!

नवी दिल्ली – स्वाइन फ्ल्युने देशभरात हाहाकार माजविला आहे. देशभरात गेल्या आठ महिन्यांत तब्बल १०९४ जणांचा स्वाइनने बळी घेतला आहे. त्यापैकी गेल्या तीन आठवड्यांत स्वानमुळे ३४२ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी स्वाईनसंबंधी आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये स्वाइनचा सर्वात जास्त प्रादुर्भाव असल्याचे दिसते. गुजरातमध्ये एकूण ४३७, तर महाराष्ट्रात ३८१ जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राजस्थान, केरळ आणि दिल्लीतही स्वाईन फ्लूची लागण झाल्याने मृत्यू झाले आहेत. स्वाईन फ्लूची लागण होणा-यांमध्ये तरुण आणि आजारी लोकांची संख्या जास्त आहे. सरकारी आकडेवारीनुसार, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात सर्वात जास्त मृत्यू झाले आहेत.

कर्नाटकमध्ये २८०५ जणांना स्वाईनची लागण झाली असून, तामिळनाडूत एकूण २९५६ रुग्ण सापडले आहेत. त्यापैही १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

स्वाइन फ्लूची लक्षणे –

स्वाइन फ्लूची लक्षणे ही सर्व साधारण फ्लूसारखीच असतात. यात थंडी, ताप १०० अंश फॅ. पेक्षा जास्त सर्दी, खोकला, घसादुखी,अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब व कधी कधी पोटदुखी इत्यादी लक्षणांचा समावेश असतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शेतक-यांसाठी खुश खबर, रसायनिक खतांवर 5 टक्के कर

News Desk

आदित्य ठाकरेंकडून महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर!

News Desk

मतदाना दिवशी जनताच भाजपला शॉक देणार, मोदीजी काळ्या पैशाचं काय झालं ?

News Desk
मुंबई

मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर रविवारी मेगा ब्लॉक

News Desk

मुंबई | मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी पश्चिम रेल्वेमार्गावर जम्बो ब्लॉक असेल. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा या स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर रविवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे.

रविवारी सकाळी १० वाजून ३७ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ३१ मिनिटांपर्यंत ठाणे स्थानकावरून अप धिम्या मार्गावरील सर्व लोकल वाहतूक मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन या स्थानकांवर थांबविण्यात येणार असून माटुंगावरून अप धिम्या मार्गावर धावणार आहेत.

Related posts

पतंगराव कदम यांचा अल्पपरिचय

News Desk

अक्सा बीचवर ‘ब्लू बॉटल’ जेलीफिशने ५४ पर्यटकांना दंश

News Desk

पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांवर  टिका करणा-या दोघांवर गुन्हा दाखल

News Desk