HW News Marathi
Uncategorized

काश्मीर प्रश्न कॉँग्रेस बोलतोय पाकिस्तानची भाषा

बंगळुरू(वृत्तसंस्था): काश्मीरप्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घणाघाती आरोप केला आहे. काश्मीरप्रश्नी काँग्रेसचे नेते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. त्यांचे बोल काश्मीरसाठी स्वातंत्र्याची मागणी करणा-या फुटीरतावाद्यांसारखे आहेत. हा आमच्या देशातील जवानांचा अपमान आहे. असा टोला काँग्रेसला लगावला आहे.

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी काश्मीर प्रश्नावरून केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला ठिणगी पडली आहे. त्याचा धागा पकडत मोदींनी चिदंबरम यांचे नाव न घेता काँग्रेसवर निशाणा साधला. ‘‘काँग्रेस्च्या एका ज्येष्ठ नेत्यांनी काल केलेले वक्तव्य त्यांचा पक्ष सैनिकांचे शौर्य आणि सर्जिकल स्ट्राइकबाबत काय विचार करतो हे दाखवणारे आहे. काश्मीरच्या भूमीवर फुटीरतावादी आणि पाकिस्तानमध्ये जी भाषा बोलली जाते, तीच भाषा काँग्रेसचे नेते करत आहेत. जे कालपर्यंत सत्तेत बसले होते. ते अचानक यू टर्न घेत आहेत. त्यांना अशा प्रकारची वक्तव्ये करण्याचा खेद वाटत नाहीये.’’असे मोदी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पन्नास हजारात खरेदी केलेल्या तरूणीवर बाबाचा आठ महिने बलात्कार

News Desk

Sharad Pawar | देशात परिवर्तनासाठी अनकूल वातावरण !

News Desk

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना मिळाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

News Desk