HW News Marathi
Uncategorized

गोयल, सीतारामन यांच्यासह स्वराज यांनी थकविले बंगल्याचे भाडे, आरटीआय’मधून खुलासा

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीचा निकालासाठी अवघे दोन दिवस राहिले असताना केंद्रीय मंत्र्यांनी सरकारी बंगल्याचे भाडे थकविल्याचे माहिती नगरविकास खात्याकडून मिळाली आहे. यानुसार केंद्रीय मंत्री विजय गोयल, प्रकाश जावडेकर, निर्मला सीतारामन, सुषमा स्वराज यांच्यासह अनेक मंत्र्यांनी फेब्रुवारी महिन्यापर्यंत सरकारी बंगल्यांचे भाडे थकविल्याची माहिती अधिकारी कार्यकर्त्याने केंद्रीय नगरविकास खात्याला मागविलेल्या माहितीमधून हे उघडकीस आले आहे.

केंद्रीय मंत्री विजय गोयल, प्रकाश जावडेकर, निर्मला सीतारामन, सुषमा स्वराज यांच्यासह अनेक मंत्र्यांनी फेब्रुवारी महिन्यापर्यंत सरकारी बंगल्यांचे भाडे थकविल्याचे समोर आले आहे. नगरविकास विभागाच्या उत्तरात केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि राज्यमंत्री जीतेंद्र सिंह यांनीही थकबाकी ठेवल्याचे सांगितले आहे. ही थकबाकी बंगल्यामध्ये वापरण्यात येत असलेले फर्निचर आणि अन्य वस्तूंबाबत आहे. नक्वी आणि सिंह यांच्यावर प्रत्येकी १.४६ लाख आणि ३.१८ लाख रुपयांची थकबाकी आहे.

आरटीआय कार्यकर्ते अजितकुमार सिंह यांनी नगरविकास खात्याकडे मंत्र्यांनी सरकारी बंगल्यांचे भाडे किती थकविले याबाबत माहिती मागवली होती. सिंह यांना २६ एप्रिल रोजी ही माहिती देण्यात आली. त्याचबरोबर सिह यांच्या अर्जाला उत्तर देताना नगरविकास खात्याने सांगितले की, मंत्र्यांना दिला जाणार बंगला विनामूल्य दिला जात असला तीर त्यात पुरविल्या जाणाऱ्या फर्निचरसह अन्य सामनाचे ठराविक दराने भाडे आकारले जाते. ही थकबाकी अशाच भाड्याच्या रक्कमेची आहे.

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारीपर्यंत 53 हजार 276 रुपये, प्रकाश जावडेकर यांनी 86 हजार 923 रुपये थकबाकी ठेवली आहे. संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांची सुमारे 3 लाख रुपये थकबाकी आहे तर केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह यांनी फेब्रुवारीपर्यंत 2 लाख 88 हजार 269 थकबाकी ठेवलेली आहे. मात्र गृहमंत्री राजनाथ सिंह, रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी, गिरीराज सिंह, जयंत सिन्हा, बाबुल सुप्रियो, रविशंकर प्रसाद, हर्ष वर्धन, उमा भारती, स्मृती इराणी यांनी सर्व देणी दिली आहेत.

किती मंत्र्यांनी थकविली भाडे

  • जितेंद्र सिंग – ३,१८,०००
  • विजय गोयल – २,९७,९२३
  • गजेंद्र सिंग – २,८८,२६९
  • मुक्तार अब्बास नक्वी – १,४६,०००
  • प्रकाश जावडेकर – ८६,९२३
  • निर्मला सितारामन – ५३,२७६
  • थावरसिंग गेहलोत – १४,६२७

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जीएसटीबाबत सर्वत्र संभ्रमाचे वातावरण

News Desk

देशात ६० वर्षांमध्ये काँग्रेसनं काय केलं?, भास्कर जाधवांनी केली मोदींची मिमिक्री

News Desk

अजित पवारांवर वेब सीरिज केल्यास ३०० कोटी रॉयल्टी मिळेल, सोमय्यांची खोचक टीका

News Desk