HW News Marathi
Uncategorized

जब हॅरी मेट सेजलच्या नविन गाण्याचे प्रदर्शन

हर्षदा वेदपाठक

मुंबई इम्तयाज अली दिग्दर्शित जब हॅरी मेट सेजल या चित्रपटातील बीच बीच में…या गाण्याचे प्रदर्शन सोमवारी मुंबईत करण्यात आले. त्या प्रसंगी शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा हे प्रमुख कलाकार देखील उपस्थीत होते.

शाहरुख आणि इम्तयाज अली हे दोघेही आठ वर्षापासून एकत्रीत काम करायचे स्वप्न बघत होते. परंतु ते प्रत्यक्षात उतरलं ते जब हॅरी मेट सेजल या चित्रपटाद्वारे त्याबद्दल प्रमुख अभिनेता शाहरुख खान याने समाधान व्यक्त केले. तर रब ने बना दी जोडी या चित्रपटद्वारे चित्रपटक्षेत्रात पदार्पण करणारी अनुष्का शर्मा पुन्हा एकदा शाहरुख खानबरोबर काम करताना दिसणार आहे. सतत व्यस्त राहणा-या शाहरुख खान बरोबर काम करण्याचे स्वप्न या चित्रपटाद्वारे पुर्ण झाल्याचे मत दिग्दर्शक इम्तयाजने यावेळी व्यक्त केलं.

प्रेमकथांकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची खासीयत बाळगलेल्या चित्रपटांसाठी प्रसिध्द असलेल्या दिग्दर्शकांमध्ये इम्तयाज अलीचे नाव घेतले जाते. जब वी मेट, लव्ह आज कल, रॉकस्ट्रार, कॉकटेल, हायवे, तमाशा या चित्रपटाची यादी पाहता जब हॅरी मेट सेजल या चित्रपटाकडूनही वेगळेपणाची अपेक्षा सिनेमाप्रेमींनी न बाळगल्यास नवलच..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सामुहिक बलात्कार प्रकरणात, पाच पोलिस अधिकारी निलंबित

News Desk

“राजकाणात जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे”, अमित शहांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

Aprna

सैन्य दलातील भरतीच्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात बिहारमध्ये आंदोलन

Aprna