HW News Marathi
Uncategorized

मी देवेंद्र फडणवीसांना विचारले मग कसे काय पाऊसपाणी ?

मुंबई | “मी आणि देवेंद्र फडणवीस शेजारी बसलो यांचा अर्थ काहीतरी राजकीय असले असे नसते. आम्ही इकडच्या तिकडच्या चर्चा केल्या कसे काय पाऊसपाणी यांच्या गप्पा मारल्या,” असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या मुलांच्या लग्न सोहळ्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्पांवर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी गंमतीने उत्तर दिले.

अजित पवार पुढे म्हणाले की, “राजकारणात कधी कोणी एकमेकांचे कायमच वैरी नसतात. सत्ताधारी किंवा विरोधक एकत्र आल्यानंतर एकमेकांना नमस्कार करतात. एकत्र बसतात, चर्चा होते. यात दुसरे काहीही नव्हते. संजय शिंदे यांनी आग्रहाने मला आणि इतरांना बोलावले होते, म्हणून त्या लग्नाला आम्ही गेलो होतो. खुर्च्या ठेवताना अशा ठेवल्या की माझी आणि फडणवीस शेजारी शेजारी बसलो, इतकेच. त्यामुळे शेजारी बसल्यावर आम्ही थोडीफार इकडची-तिकडची चर्चा केली…कसे काय पाऊसपाणी वैगेरे,”

माजी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांबाबत अनेक दावे केले. याबाबत विचारले असता, त्यावेळी अजित पवार म्हटले की, मला यावर काही उत्तर द्याचे नाही, असे सांगत त्यांच्या प्रश्नांला उत्तर देण्यास नकार दिला. दरम्यान, “मला बारामतीची प्रचंड कामे आहेत, त्यांची कामे करणे हेच माझे एकमेव काम आहे. तेच मी करत राहणार आहे,” अशा शब्दात अजित पवार यांनी फडणवीस यांच्या मुलाखतीवर उत्तर देण्यास टाळले.

लग्नसोहळ्यात माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची गप्पा

राज्यातील सत्ता स्थापनेच्या नाट्यातनंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच एकत्र दिसले. करमाळा मतदारसंघाचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या मुलाचे लग्न काल (८ डिसेंबर) माढ्यात पार पडले. या लग्नात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार शेजारीच बसले होते. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. लग्नात दोघांच्या गप्पांची दृष्टवरून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राजकाणात जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे”, अमित शहांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

Aprna

महाविकासआघाडीचे ‘मिशन’ नवी मुंबई, गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

swarit

मुंबईमधील वाडिया रुग्णालयातील बंद ऑपरेशन थिएटरमध्ये लागली आग

Aprna