HW News Marathi
Uncategorized

जाड पुरुषांची सेक्स लाईफ इतरांपेक्षा का वेगळी असते?

मुंबई: राज सामान्य तरूणांच्या तुलनेत जरा जाड होता आणि त्याचं पोटही जरा बाहेर आलं होतं. त्यामुळे ऑफिसमध्ये त्याची खिल्ली उडवली जात होती. जेव्हा राजचं लग्न झालं तेव्हा सुरूवातीला त्याला त्याच्या पार्टनरसोबत शारिरीक संबंध ठेवताना लाज यायची. अशात त्याला त्याच्या एका मित्राने एक बातमी वाचायला दिली. जी वाचून राजचा आत्मविश्वास वाढला. आणि आज तो आपल्या पत्नीसोबत हसत-खेळत वैवाहिक जीवन एन्जॉय करतो आहे.

खरंतर ही केवळ एकट्या राजची समस्या नाहीये. राजसारखाच प्रत्येक जाड असलेल्या पुरूषाला जाडेपणामुळे कमीपणा वाटत असेल. ब-याचदा पोट बाहेर आलेले पुरूष आपल्या पार्टनरसोबत शारिरीक संबंध ठेवताना जरा अवघडलेले असतात. असे ब-याचदा अनेकांनासोबत होत असेल. जर तुमच्यासोबत असे होत असेल तर हा रिसर्च तुमच्यासाठी खूप फायद्याचा आहे. नुकताच एक शोध यावर टर्कीमध्ये झाला आहे. या शोधातून समोर आले आहे की, मोठी कंबर असलेले किंवा पोट बाहेर आलेले पुरूष बेडमध्ये अन्य स्लिम पुरूषांपेक्षा चांगले असतात.

टर्की येथे झालेल्या या शोधात १०० पुरुषांच्या बॉडी मास इंडेक्स आणि मेल सेक्श्युअल परफॉर्मेन्सचा अभ्यास करण्यात आला.

या शोधात आढळलं की, जास्त वजन असणारे पुरूष स्लिम पुरूषांच्या तुलनेत बेडमध्ये पाच मिनिटे अधिक टिकतात.

शोधकर्त्यांनी हेही पाहिले की, जास्त पोट असलेले पुरूष ७.३ मिनिटे अधिक जास्त सेक्स करू शकतात.

शोधकर्त्यांनुसार, जास्त जाड असलेल्या पुरूषांमध्ये सेक्सचा स्टॅमिना अधिक असतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईमधील वाडिया रुग्णालयातील बंद ऑपरेशन थिएटरमध्ये लागली आग

Aprna

सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले- शरद पवार

swarit

विरोधकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे !

News Desk