HW News Marathi
Uncategorized

राष्ट्रीय अनुसूचित जाति आयोग कार्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती

उत्तम बाबळे

दिल्ली :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा ९७ वा जयंती सोहळा दिल्ली येथील राष्ट्रीय अनुसूचित जाति आयोग कार्यालयात पहिल्यांदाच साजरा करण्यात आला असून हा एैतिहासिक महत्वपुर्ण योग वंचित,उपेक्षीतांच्या न्याय हक्कासाठी लढणारे एम.आर.पी.एस.चे संस्थापक लोकनेते मंदाकृष्णा मादिगा यांच्यावतीने करण्यात आले.

१ आॅगस्ट २०१७ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ९७ वी जयंती महाराष्ट्रसह देश विदेशात साजरी होत असतांना दिल्ली येथील राष्ट्रीय अनुसूचित जाति आयोग कार्यालयात मात्र ती साजरी होत नसल्याचे कळाल्यावरुण आॅल इंडिया एम.आर.पी.एस.- मातंग आरक्षण संघर्ष समितीचे संस्थापक तथा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अ,ब,क,ड मागणीचे अग्रणी राष्ट्रीय लोकनेते मंदाकृष्णा मादिगा यांनी आयोगाचे अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधला व कार्यालयात जयंती साजरी करण्यास अनुमती घेतली.तसेच आयोगाचे मुख्य सदस्य के.रामलू यांच्या अध्यक्षतेखाली व लोकनेते मंदाकृष्णा मादिगा यांच्या मुख्य उपस्थितीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुण छोटेखानी सभा घेऊन हा सोहळा साजरा करण्यात आला.यावेळी एम.आर.पी.एस.महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अजित केसराळीकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. मनोगत व्यक्त करतांना लोकनेते मंदाकृष्णा मादिगा म्हणाले की,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे त्यांचे सत्यशोधकी विशाल साहित्य व कर्तुत्वातून रशियासह अनेक देशात पोहचले आहेत.परंतू आपल्याच देशात अजून अशा ब-याच ठिकाणी पोहचले नाहीत.ते काम आता आपल्या सारख्या अनुयायींनी केले पाहिजे तरच त्यांची उतुंग प्रतिभा कळेल.तर अध्यक्षीय समारोपात के.रामलू म्हणाले की,अनुसूचित जातीसाठी जे कार्यालय देश पातळीवर काम करते.त्या कार्यालयात वंचित,उपेक्षीतांचे प्रेरणास्थान असलेले बहुजन नायक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सारख्या महान प्रतिभावंताचा जयंती सोहळा प्रथमच साजरा करण्याच्या एैतिहासीक योग लोकनेते मंदाकृष्णा मादिगा यांनी घडऊन आणला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सिध्दांत आणि व्यवहार’ विषयावर चर्चासत्र

News Desk

पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुसळधार कोसळणार, हवामान खात्याने दिला Alert

News Desk

सामुहिक बलात्कार प्रकरणात, पाच पोलिस अधिकारी निलंबित

News Desk