HW News Marathi
राजकारण

संजय राऊतांची ED कोठडी वाढणार की जामीन मिळणार?

मुंबई। शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज ईडी कोठडी संपणार आहे. यामुळे राऊतांना आज ( ४ ऑगस्ट ) पीएमएलए न्यायालयात हजर केले जाणार आहेत.  पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Case) न्यायालयाने राऊतांना 1 ऑगस्ट रोजी ईडी कोठडी सुनावली.  ईडी राऊतांना जामीन देणार की कोठडी सुनावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राऊतांना ईडीने अटक केल्यानंतर आठ दिवसांची कोठडीची मागणी केली होती. परंतु, राऊतांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करत आठ दिवसांच्या कोठडीची गरज काय?, असा सवाल उपस्थित करत न्यायालयाला विनंती करत त्यांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली. यानंतर राऊतांना आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर करणार आहेत.
ई़डी 31 जुलै रोजी सकाळी राऊतांच्या भांडूप येथील मैत्री या निवासस्थानी छापा टाकला. यानंतर ईडीने राऊतांच्या निवासस्थानी 9 तास चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. ईडीने राऊतांची ईडी कार्यालयात 7 तास चौकशी केल्यानंतर त्यांनी राऊतांना अटक केली. राऊतांना ईडीने 16 तासाच्या चौकशी केल्यानंतर अटक केली. राऊतांना 1 ऑगस्ट रोजी ईडीने जे.  जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पीएमएलए न्यायालयात हजर केले. यानंतर न्यायालयाने राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावणी

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव! – नाना पटोले

News Desk

जर मोदी जन्मतः ओबीसी असते तर संघाने त्यांना पंतप्रधान होऊ दिले असते का ?

News Desk

नव्या संसद इमारतीत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी पंतप्रधानांना विनंती करणार! – मुख्यमंत्री

Aprna