HW News Marathi
राजकारण

भाजप हळूहळू सर्व मित्र पक्षांना संपवते! – शरद पवार

मुंबई | “भाजप त्यांच्या बरोबर असलेल्या सर्व मित्र पक्षांना हळूहळू संपवतात,” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर केले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी काल (9 ऑगस्ट) त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर बिहारमध्ये (Bihar) काल भाजप-जेडीयूची युती तुटली. बिहार आणि महाराष्ट्राच्या सध्याच्या स्थितीवरून शरद पवारांनी हल्लाबोल केला आहे. तर  दुसऱ्या बाजूला शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला.

शरद पवार म्हणाले, “ही नितीश कुमार यांची तक्रार आहे. भाजप त्यांच्या बरोबर असलेल्या मित्र पक्षांना हळूहळू संपवतात. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना अनेक वर्ष एकत्र होते. आज शिवसेनेची अवस्था तिचे डिविजन करून, शिवसेना दुबळी कशी करता येईल. याची भाजपने आखणी केली. आणि त्याला एकनाथ शिंदे आणि इतर लोकांची मदत झाली. त्यामुळे शिवसेनेवर आघात त्यांच्या एकेकाळच्या मित्र पक्षाने केला.”

नितीश कुमार यांनी  काल सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास  त्यांनी बिहारच्या राज्यपालांची भेट घेतली. या भेट घेऊन नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे. “आम्ही एनडीएची साथ सोडली”, असे नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. राष्ट्रीय राजकारणात बिहारमधील भाजप-जेडीयूची युती तुटल्यामुळे मोठा झटका असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत.

भाजपसमोर कोणताही प्रादेशिक पक्ष शिल्लक राहणार नाही – जेपी नड्डा

“देशात भाजपसोबत (BJP) मुकाबला करण्यासाठी कोणताही प्रादेशिक पक्ष शिल्लक राहिलेला नाही,” असे वक्तव्य भाजपेच राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J.P. Nadda) यांनी केले आहे. भाजपची बिहार येथे 16 जिल्ह्यातील भाजप कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी नड्डा हे पाटणा येथे बोलताना ते वक्तव्य केले. नड्डांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती.

संबंधित बातम्या

नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा

देशात भाजपसोबत मुकाबला करण्यासाठी कोणताही राष्ट्रीय पक्ष शिल्लक राहिलेला नाही! – जे. पी. नड्डा

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केवळ मुंबई-पुण्यासारख्या शहरांनाच शिवसेनेच्या नेत्यांची नावे शोभतील !

News Desk

कोकणात राणे विरुद्ध ठाकरे

News Desk

… पुण्याच्या पाण्याची लावली वाट, पाणी कपातीवरून पुणेकरांची पोस्टरबाजी

News Desk