HW News Marathi
महाराष्ट्र

“लिस्टमधला 12 वा खेळाडू जितेंद्र आव्हाड”, किरीट सोमय्यांचा गौप्स्फोट

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर हल्ला केला आहे. ईडीच्या लिस्टमधील 12 वा खेळाडू राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे ईडीची पुढची नोटीस आव्हाडांना येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

परब यांच्याविरोधात मी पहिली तक्रार दिली

किरीट सोमय्या यांनी यावेळी बोलताना अनिल परब यांच्या अटकेविषयी देखील खुलासा केला आहे. . परब यांच्याविरोधात मी पहिली तक्रार दिली होती. त्याची सुनावणी सुरू आहे. परब यांच्या मर्जीतील अधिकारी बजरंग खरमाटे यांचीही चौकशी सुरू आहे, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना लपवून ठेवलं. आमदार प्रताप सरनाईक यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, असं सोमय्या म्हणाले आहेत.

भ्रष्ट नेत्यांना मंत्रिमंडळात कसं ठेवू शकता?

यावेळी सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जुन्या गोष्टीचं स्मरण करून दिलं. उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत असताना ईडीने केलेल्या कारवाईच कौतुक केलं होतं. मग आता भ्रष्ट नेत्यांना मंत्रिमंडळात कसं ठेवू शकता?, असा सवाल त्यांनी केला आहे. एका ट्रस्टचे महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेत रूपांतर करून 70 कोटी रुपयांची मालमत्ता आपल्या पीएच्या नावावर करण्यात आली. या ट्रस्टची महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेत रुपांतर करताना बोगस कागदपत्रे वापरण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करण्याची आमची मागणी आहे, असं सोमय्या म्हणाले आहेत.

ठाकरे सरकारची घोटाळा इलेव्हन

याबाबत किरीट सोमय्या म्हणाले, “ठाकरे सरकारची घोटाळा इलेव्हन. शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी अनधिकृत बांधकाम केलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वसुली कांडात ईडीने पुरावे दिले. परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट, परिवहन विभागात चौकशी, शिवसेना खासदार भावना गवळी यांनी बँकेचे पैसे लाटले, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी गाळे ढापले, माजी मंत्री रवींद्र वायकर आणि रश्मी ठाकरेंनी मिळून जमीन घोटाळा केला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची एसआरएचा भूखंड प्रकरणी चौकशी सुरु, छगन भुजबळांवर आरोप आहेत. शिवसेना आमदार यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांनी UAEमध्ये पैसे पाठवले तर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अनधिकृत बंगला बांधला आणि पाडला”.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जग जिंकण्याच्या इच्छेने जे सिंकदरचे झाले ते तुमचं होवू नये

News Desk

प्रशांत किशोरची मला गरज नाही – शरद पवार

News Desk

मीराबाई चानूनं देशवासियांना समर्पित केलं ऑलिम्पिक पदक….!

News Desk