HW News Marathi
राजकारण

“शिवसेना रस्त्यावर उतरेल, मग खरी शिवसेना काय…”, अरविंद सावंतांचा शिंदे गटाला इशारा

मुंबई | “शिवसैनिकांवरील खोटे कलम दाखल केले आहे. ते आता मागे घ्या, नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल. मग खरी शिवसेना काय आहे, ज्यांना कोणाला पाहायची आहे. त्यांना कळेल की शिवसेना काय आहे”, असा धमकी वजा इशारा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी शिंदे गटाला दिला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याप्रकरणी सावंत आज (11 सप्टेंबर) दादर पोलीस स्ठानकाबाहेर माध्यमांशी बोलताना म्हणाले. राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसेनाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. ही घटना जेव्हा घडली होती. तेव्हा पोलिसांच्या मध्यस्थी केल्यनंतर संपूर्ण प्रकरण शांत झाले होते. परंतु, हे प्रकरणात काल (10 सप्टेंबर) शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केली, असा आरोप म्हणजे  शिवसेनेचे आमदार सुनील शिंदेंनी केला होता. यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी शिवसेनेच्या 25 जणांवर गुन्हा दाखल केला होता आणि पाच जणांना अटक केली होती.

 

अरविंद सावंत म्हणाले, ” यापूर्वीच्या सरकारने उद्धव ठाकरे सरकारने गुंडांचा बंदोबस्त केला. उद्धव ठाकरेंच्या कारकीर्दीत एकही दंगा घडला नाही. त्यावेळी कोणाची हिंमत झाली नाही. आता राज्यकर्तेच रोज येवून सांगतो की चून चून के मारेगा, दुसरा बोलतो तंगडे तोडेन, तिसरा आमदार गोळीबार करतोय आणि चौथी महिला खासदार पोलीस स्थानकात जावून पोलीस स्टेशनमध्येच गैरवर्तन करते. पण, त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. म्हणून आज आम्ही सर्व जण आलोय आणि आम्ही आज पोलिसांना सांगितले, ही जर गुन्हा गुंडा गर्दी अशीच चालू राहिली. मग, राज्य काय चालय. एका बाजुला बंदुकीचा वापर करून गोळी चालविली. परंतु, कारवाई त्यांच्यावर कारवाई होत नाही. म्हणून आम्ही सर्वजण बसलो होतो. शिंदे गटाचे आमदारांवर आर्म्स अॅक्सअंतर्गत त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यांच्या गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही हलणार नाही. शिवसैनिकांवर जो 395चा खोटे कलम दाखल केले आहे. ते आता मागे घ्या, नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल. मग खरी शिवसेना काय आहे, ज्यांना कोणाला पाहायची आहे. त्यांना कळेल की शिवसेना काय आहे.

 

उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अरविंद सावंतांची मागणी

“राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत. आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा इतिहास तर आपल्याला माहिती आहे. खरे तर या सर्व प्रकाराची त्यांना लाजवाटली पाहिजे आणि त्यांनी राजीनामा त्याला हवा. कायदा सुव्यवस्था पाहण्याचे काम राज्यकर्त्यांचे असते. पण, आज राज्यकर्तेच गुंडगिरी करत आहेत. त्यामुळे राज्यात जी काही अवस्था निर्माण होते. या परिस्थितीचा आम्ही जाहीर निषेश करतोय. आम्ही गेल्यानंतर पोलिसांनी आमच्या तक्रारीचा मान ठेवणत तक्रार घेतली. सरवणकरांवर गुन्हा दाखल झाला आहे. पण त्यांना कधी अटक करणार हे पाहायचे आहे. आमच्या  395 चा गुन्हा मागे, अशी विनंती केली. पोलिसांनी याला होकार दिला आहे. पोलीस त्यांना किती वेळा सोडणार, त्यांना जर राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडवायची असेल,” असे अरविंद सावंत यावेळी म्हणाले.

 

 

 

 

 

 

Related posts

काश्मीरमधील ३ फुटीरवादी नेत्यांना १० दिवसांची एनआयए कोठडी

News Desk

अण्णांच्या गर्जनांचा पचपचीत गाजर हलवा झाला | उद्धव ठाकरे

News Desk

Breaking News | रोहित पवार-रविकांत तुपकरांची बंद दाराआड चर्चा, स्वाभिमानी शेतकरी संघटना ३ जागांवर ठाम

News Desk