HW News Marathi
राजकारण

Breaking News | रोहित पवार-रविकांत तुपकरांची बंद दाराआड चर्चा, स्वाभिमानी शेतकरी संघटना ३ जागांवर ठाम

विशाल पाटील | सध्या आघाडीचे सर्व समविचारी पक्षांचा समावेश करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बुलढाणा राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार हे १८ फेब्रुवारी रोजी बुलढाणा दौऱ्यावर होते. यावेळी काँग्रेस आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवासस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर आणि रोहित पवार यांच्यात बंद दाराआड तब्बल १ तास चर्चा झाली असून या चर्चेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभेच्या तीन जागा मिळाव्यात यावर ठाम आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

रोहित पवार-रविकांत तुपकर यांच्यात झालेल्या भेटीने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. बुलढाणा लोकसभा जागेवरून आघाडीमध्ये खलबते सुरू आहेत. “राष्ट्रवादीकडून राजेंद्र शिंगणे यांना उभे करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तुपकरांना उभे करण्यास राजू शेट्टी इच्छुक आहेत. त्यामुळे येत्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीत समावेश होऊ शकते”, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार ईडीचा पाहुणचार घ्यायला स्वत: जाणार

News Desk

जाणून घ्या… आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले महत्वाचे निर्णय

Aprna

“शिवसैनिकांच्या डोळ्यातील अश्रूंची किंमत मोजावी लागणार,” उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना इशारा

Aprna