मुंबई | “मुख्यमंत्र्यांनी 5 हजार कोटींची घोषणा केली होती. यावर कधी टेंडर निघणार?, कधी काम सुरू होणार?, त्या टेंडरचे काय झाले?,” असे सवाल उपस्थित करत ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर टीका केली. आदित्य ठाकरेंनी आज (18 नोव्हेंबर) पत्रकार परिषदे घेऊन मुख्यमंत्री, शिंदे गट आणि भाजपवर टीका केली. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यासंदर्भात देखील आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.
“बीएमसीमध्ये तीन गोष्टी घडत आहेत. बीएमसीमध्ये टेंडर, ट्रान्सफर आणि टाईमपास सुरू आहे. असा आरोप मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी केला होता. मुख्यमंत्र्यांच्या आरोपावर प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरे म्हणाले, “रस्ते हे रातोरात खड्डेमुक्त होत नाहीत. एका रस्ता बनविण्यासाठी 42 युनिटिलटीवर काम करावे लागते. रस्ते खड्डेमुक्तीचे काम हे 1 ऑक्टोबर ते 1 जूनदरम्यान काम होत असतात. परंतु, ऑक्टोबर निघून गेला आहे. तरी सुद्धा कधी काम सुरू होणार?, टेंडर कधी निघणार? रस्ते मुक्त करण्यासाठी 5 कोटी देऊनही लोक का आले नाही?, ” या प्रश्नांचे मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे,” असे ते म्हणाले.
राहुल गांधीच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यासंदर्भात राज्यभरात विरोध प्रदर्शन होत आहेत. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आम्ही त्यांच्या मताची सहमत नाही, असे म्हणत भूमिका स्पष्ट केली होती. यानंतर वीर सावरकराच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी फुट पडू शकते, असे संकेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हणाले. यावर आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देताना म्हणाले, “आपण सर्वांनी 50 वर्षापूर्वी किंवा 100 वर्षापूर्वी कोण योग्य आणि कोण अयोग्य होते. त्यावर भांडण करायला लागलो. तर भविष्यासाठी कोण भांडणार आणि आताच्या स्थितीसाठी कोण भांडणार?”, असे ते म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.