HW News Marathi
महाराष्ट्र

माझ्या फंदात पडू नकोस नारायण राणेंचा संजय राऊतांना सज्जड दम!

मुंबई। नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला केला. संजय राऊत संपादकीय लिहितो, मात्र समोर आला की नमस्कार करतो. उद्धव ठाकरेना सांगतोस शिवसैनिक आहे. मात्र शरद पवारांना गुपचूप जाऊन भेटतो. टीका कर कार्यकारी संपादक राहशील, रोजदांरीवर संपादक आहेस. पण माझ्या फंदात पडू नकोस, असा थेट इशारा देत नारायण राणेंनी राऊतांवर टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणेंवर अटकेची कारवाई झाली. त्यावर संजय राऊतांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या टीकेचा राणेंनी देखील समाचार घेतला आहे.

संजय राऊत यांची मानसिक स्थिती चांगली आहे?

जन आशीर्वाद यात्रेदरम्यानच त्यांनी राऊतांवर शरसंधान साधले. तसेच शिवसेनेच्या अन्य काही नेत्यांचाही समाचार घेतला. संजय राऊतांच्या भूमिकेवर आगपाखड करताना ते म्हणाले, माझ्याविरोधात बोलतो, मात्र समोर दिसल्यानंतर मला कसे आहात, असे विचारतो. संजय राऊत यांची मानसिक स्थिती चांगली आहे? असा खोचक सवाल उपस्थित करीत राणेंनी राऊतांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. संजय राऊत टीका करून फक्त कार्यकारी संपादक राहिल्याचे ते म्हणाले. याचवेळी त्यांनी राऊतांना माझ्या फंदात न पडण्याचा थेट इशारा दिला. मला तुम्हाला उद्योजक बनवायचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

शिवसेना सरकारी मालमत्ता विकायला लागली

भाजपने मला केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. याचा योग्य वापर करून मी जनतेला लाभ मिळवून देणार असल्याची हमी नारायण राणेनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान दिली. याचवेळी त्यांनी शिवसेना आणि शिवसेनेच्या सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पदाधिकार्यांवर टीकास्त्र सोडले. शिवसेना सरकारी मालमत्ता विकायला लागली आहे. पण आम्ही ती विकू देणार नाही, असा इशारा त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. शिवसैनिकांची यातायात झाली असल्याचे नमूद करीत त्यांनी सिंधुदूर्गातील शिवसेना आमदारांवर हल्लाबोल चढवला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन वाझेंवर होणार शस्त्रक्रिया!

News Desk

अयोध्येस चोरांची आळंदी करणाऱ्यांना श्रीराम माफ करणार नाहीत! सामनातून टीका

Aprna

OBC आरक्षणासंदर्भात मोठी बातमी, निवडणुकांना स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार!

News Desk