HW News Marathi
राजकारण

“…मग दोन पक्षांतर करणाऱ्यांचे जुळाले असेल”, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई | “आपल्या राज्याचे मुख्यमंत्री ही त्याच पद्धतीचे आहेत. ते आणि शिवसेनेचे मग ते भाजपचे आहेत. मग दोन  पक्षांतर करणाऱ्यांचे जुळाले असेल”, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना लगावला आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासह शिंदे गटाचे 40 आमदार गुवाहाटी येथील कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आसाम दौऱ्यावर गेले आहेत. या पार्श्वभूमीव राऊतांनी आज (27 नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आसाम दौऱ्यावर आहेत आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आसाम भवनसाठी मुंबई जागा मागितली, यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “मला असे वाटते, नवी मुंबईमध्ये आसाम भवन आहे. महाराष्ट्रात सगळ्याच राज्यांना जागा हवी आहे. पण, महाराष्ट्राला कधी कोण जागा देणार आहेत का?, कर्नाटकचे मुख्यमंत्री सोलापूर आणि सांगलीतील जत जिल्हा खेचून घ्याईला निघाले आहेत. गुजरात आमचे उद्योगधंदे पळवित आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत. महाराष्ट्रातील हे सरकार खोके सरकार म्हणून देशात मान्यता मिळालेले आहे. त्यांचे आणि आसामचे काय नाते आहे हे मला अचानक नाते निर्माण झाले आहे. आसामचे मुख्यमंत्री तशी मुळचे काँग्रेसवाले ते ही  पक्षांतर करूनच भाजपमध्ये आले. आणि मुख्यमंत्री झालेले आहेत. आणि आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री ही त्याच पद्धतीचे आहेत. ते आणि शिवसेनेचे मग ते भाजपचे आहेत. मग दोन  पक्षांतर करणाऱ्यांचे जुळाले असेल. पण, मुंबईमध्ये आता जागा नाही. माझ्या माहिती प्रमाणे नवी मुंबईमध्ये आसाम भवन आहे, अशी माझी माहिती आहे. मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आसामची जनता आहे. ती फार गुणा गोविंदाने राहत आहे. संस्कृतिक आणि इतर भाषा ज्या आहेत. देशातील ज्या भाषा आहेत, आम्ही त्यांचा सन्मान करतोय. आणि निर्णय हा शेवटी राज्य सरकारने घ्याचा आहे.आसामच्या मुख्यमंत्र्यांनी 40 आमदारांना बोलविले, कामाख्या देवीच्या दर्शनाला, असा या आमदारांचा दावा आहे. आम्हाला कधी बोलविले नाही. कारण आम्ही पक्षांतर केलेले नाही”, असा टोलाही राऊतांनी शिंदे गटाला लगावला आहे.

शिवरायांचा अपमान करणाऱ्यांविरोधात सर्वांनी एकत्र यावे

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासंदर्भात संभाजी राजेंनी ट्वीट केलेले आहे की महाराष्ट्रातील जनतेला गृहीत धरू नये, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर ते म्हणाले, “संभाजीराजे असतील किंवा साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे असतील. त्यांची जी भावना आहे ती संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे. शिवसेनेने किंवा महाविकास आघाडीने सातत्याने या विषयावर आवाज उठवण्याचे काम चालू ठेवलेले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांनी यासंदर्भात अल्टिमेटम दिलेला आहे. उद्धव ठाकरेंचे असेही म्हणणे आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ज्या पद्धतीने भाजपकडून केला जातोय, आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने महाराष्ट्रावर हल्ले करत आहेत. या सगळ्याच्या विरोधामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र यावे. मग यात उदयनराजे भोसले असतील संभाजीराजे छत्रपती असतील, महाविकासआघाडी असेल, संभाजी ब्रिगेड असेल, तर ज्यांना महाराष्ट्राविषय आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषय श्रद्धा आहे. अभिमान आहे. त्या प्रत्येकाने एकत्र ऐवून महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करणाऱ्यांविरोधात एकत्र यावे, ही आमची भूमिका आहे. आणि मला असे वाटते की लवकरच त्याबाबत कठोरची कारवाईसंदर्भात निर्णय होईल.”

 

 

 

 

 

 

Related posts

“सरकारमध्ये जे खुर्चांना फेविकॉल लावून बसलेत”, संजय राऊतांची टीका

Aprna

EXIT POLL : तेलंगणातील जनतेचा कौल टीआरएसच्या बाजूने, भाजपची घोर निराशा

News Desk

Bhima Koregaon : जाणून घ्या…भीमा-कोरेगावचे महत्त्व लोकांना कधी कळले ?

News Desk