HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

जितेंद्र आव्हाडांच्या जामिनावरील सुनावणी पूर्ण; थोड्याच वेळात निकाल येणार

ठाणे | ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून सुरू असलेला वाद आता पोलीस स्टेशन आणि न्यायालयापर्यंत गेला आहे. या चित्रपटाला विरोध करणारे आणि थेट सिनेमागृहात जाऊन चित्रपट बंद करण्याची भूमिका घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली. मात्र, या अटकेविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि आव्हाड यांचे समर्थक आंदोलन करत आहेत. या प्रकरणी आज जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्यांच्या जामिनावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र, न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे.

मॉलमधील मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना ठाण्याच्या वर्तक नगर पोलिसांनी अटक केली. आव्हाड यांच्यासह त्यांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादी परीक्षित विजय धुर्वे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. तर शुक्रवारी (11 नोव्हेंबर) आव्हाड यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन बाहेर मोठा गराडा घातला. यानंतर आव्हाड यांची वैदकीय तपासणी करण्यात आली, तर आज त्यांना ठाणे सत्र न्यायालयात आणण्यात आलं.

दरम्यान, आज न्यायालयात आव्हाडांचे वकील प्रशांत कदम यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला. आव्हाड आणि इतर लोकांवर दाखल झालेले गुन्हे चुकीचे आहेत, असं त्यांनी म्हंटलं. तर सरकारी वकिलांनी आणखी ७ दिवसांसाठी आव्हाड आणि इतर १२ कार्यकर्त्यांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी केली. दरम्यान, आव्हाडांच्या जामिनावरील सुनावणी आता पूर्ण झाली असून आज दुपारपर्यंत निर्णय समोर येणार आहे. मात्र, तोवर जितेंद्र आव्हाडांना पोलीस स्टेशनमध्येच थांबावं लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यात वाघाच्या बछड्याचा मृत्यू

News Desk

डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर

News Desk

“मी मुख्यमंत्री पदी नको, समोर येऊन सांगा मग…,” मुख्यमंत्र्यांचे एकनाथ शिंदेंना भावनिक आवाहन

Aprna