HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी

मुंबई | महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. आता राज्यात बैलगाडा शर्यतींचा धुरळा उडणार आहे. न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २०१७ मध्ये बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज (१६ डिसेंबर) बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे.

राज्यात जवळपास ७ वर्षांनी बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाली आहे. राज्य सरकारच्या वतीने मुकुल रोहतगी बैलगाडा शर्यतीसाठी युक्तिवाद केला आहे. सर्वोच्च न्यायालयता न्यायमूर्ती अजय खानविलकर, न्यायमूर्ती सी. टी. रविकुमार आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या त्रिसदस्यी पीठासमोर सुनावणी झाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणासाठी कायदेशीरबाबी पूर्ण कराव्या लागतील | मुख्यमंत्री

swarit

“पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी मुंबई महापालिका जिंका” – चंद्रकांत पाटील

News Desk

उद्धव ठाकरेंच्या ‘या’ मागणीला आनंद महिंद्रांनी दर्शवला पाठिंबा

News Desk