मुंबई | भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात 500 कोटी रुपयापर्यंत आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण किरीट सोमय्या यांच्याकडे चार वेळा पाठविले. परंतु, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे किंवा काँग्रेस पक्षाचे भ्रष्टाचार असेल तर माझ्याकडे घेऊन या. बाकी मी कोणत्याही भ्रष्टाचाराला हात लावणार नाही”, असे वक्तव्य भाजपचे नेते किरीस सोमय्या यांनी केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. या प्रकरणाची राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जवळ जवळ 2 हजार पानाचे पुरावे पाठविले असल्याची माहिती संजय राऊत यांनी आज (13 मार्च) माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
संजय राऊत म्हणाले, “संजय राऊत म्हणाले, “भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याचे प्रकरण मी किरीट सोमय्या यांच्याकडे चार वेळा पाठविले. दौंडचे काही प्रमुख शेतकरी आणि काही सामाजिक कार्यकर्ते हे किमान चार वेळा किरीट सोमय्या यांच्याकडे हे प्रकरण घेऊ गेले. त्यावेळी त्यांना सर्व वस्तू स्थिती आणि भ्रष्टाचार समजावून सांगितला. त्यावर सोमय्या त्यांना सांगतो की, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे किंवा काँग्रेस पक्षाचे काही असेल तर माझ्याकडे घेऊन या. बाकी मी कोणत्याही भ्रष्टाचाराला हात लावणार नाही. हे किरीट सोमय्यांचे वक्तव्य आहे. शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्यापैकी कोणाची काही प्रकरणे असतील. तरच मी हात लावणार. तेव्हा त्या शेतकऱ्यांनी सांगितले की, साहेब आमचे 500 कोटी रुपये या प्रकरणात लुटलेले आहेत. आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत. ते काही असले तरी मी हे प्रकरण घेणार नाही. अशी अनेक प्रकरणे गेल्या काही दिवसांपासून मी एक टेस्ट केस केली. सोमय्याकडे पाठविली, सोमय्या इतकेच सांगतो की, शिवसेनेचे काही असेल तर द्या. काँग्रेसचे काही असेल तर द्या. मी ही प्रकरणे ईडीपर्यंत घेऊन जाईन. आणि लोकांवर कारवाई करायला लावेन. याचा अर्थ काय समजायचा. या महाराष्ट्रत आणि देशामध्ये ज्या प्रकारे एकतर्फी कारवाई सुरू आहेत. आणि बाकी सगळे दुधतल्या तांदळासारखे आहेत. हे आता स्पष्ट होतय. जे तुमच्या बरोबर आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराला अभ्य द्याचे आणि जे तुमच्या बरोबर नाहीत. त्याना अनेक खोट्या प्रकरणात गुंतवायचे इडी, सीबीआय, पोलीस, ईवोडब्ल्यू असेल आणि त्यांना अडचणीत आणायचे. त्यांच्या कुटुंबाना अडचणीत आणायचे हे स्पष्ट दिसतय.”
पाटसचा भीमा सहकारी कारखान्याचे प्रकरण साधे नाही. हे सरळ सरळ 500 ते 550 कोटी रुपयांचे मॅंनी लाँड्रिंग आहे. अनेक व्यवहारातील पैस आले कुठून गेले कुठे याचा हिशेब ऑडिटरला लागलेला नाही. मग, हे पैसे परदेशात गेले किंवा परदेशातून परत हे जे काही शेअर कंपन्यामार्फत आले गेले. यांचा तपास खरे तर किरीट सोमय्या सारख्या भाजपच्या एजेंन्सीने करायला पाहिजे होता. तो केला नाही. मग ते दापोलीत जातील, खेडमध्ये जातील. कागलला जातील. किंवा अन्य ठिकाणी जातील. नागपूरला जातील, वाशिमला जातील, पण जेथे खरोखर भ्रष्टाचार, लुटमार देशाची आणि महाराष्ट्राची सुरू आहे. तिथे भाजपचे लोक आणि त्यांच्या एजेंन्सीच जात नाहीत. हे मी वारंवार सांगतोय, यासंदर्भातील जवळ जवळ 2 हजार पानाचे पुरावे मी आज देवेंद्र फडणवीस यांना मिळतील. तरीही त्यांना या भ्रष्टाचाराचे ब्रिर्फ मी व्यवस्थित करून पाठविलेले आहेत. या कारखान्याचे चेअरमान राहुल सुभाष कुल आहेत. हे भाजपचे खंबीर पाठीराखे असतात. राहुल कुल यांचे माझ्याशी कोणताही वाद नाही. हे प्रकरण माझ्या समोर आले. मी त्यांचा अभ्यास केला. आणि आज मी लोकांसमोर मांडतोय. आणि भविष्यामध्ये किमान 17 ते 18 साखर कारखान्याची प्रकरणे मी देवेंद्र फडणवीस यांना पाठविणार आहे.”
पाटस-भीमा साखर कारखान्यात आर्थिक गैरव्यवाहाराचे पुरावे उपमुख्यमंत्र्यांना पाठविले
“हा फक्त योगायोग असू शकेल, मी त्यासंदर्भातील कागतपत्रे पाटसचा भीमा सहकारी साखर कारखाना अगदी व्यवस्थिती साधारण आतापर्यंत 500 ते 550 कोटी रुपयापर्यंत आर्थिक गैरव्यवहार या कारखान्यात झाला असून जवळजवळ हजारो शेतकरी, भागदार यांची कशी लुट झालेली आहे. यांचे संपूर्ण पुरावे, ऑडिट रिपोर्टसह मी या राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेले आहेत. यासंदर्भात मी समाज माध्यमातून सुद्धा लोकांना माहिती दिली आहे. आपला प्रश्न बरोबर आहे. या कारखान्याचे चेअरमन हे राहुल कूल आहेत. आतापर्यंत माझ्याकडे साधारण 17 कारखान्यांची प्रकरणे माझ्याकडे आहे. त्यातील हे पहिले प्रकरण आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये विशिष्ट राजकीय पक्षांविरोध विशेत:हा भाजपचे विरोधक आहेत. त्यांच्या विरोधामध्ये पीओडब्ल्यू, सीबीआय, ईडी यांच्या कारवाया फार जोरात सुरु आहे. विशेतहा साखर कारखानदार असतील. लहान-सहान उद्योजक असतील. कदम यांना अटक केलेली आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते आम्ही सगळे त्या चरकारतून पिळून निघालेलो आहोत. अशा वेळेला फक्त एकाच पक्षाच्या राजकीय विरोधक आहेत. त्यांच्या मागे तुम्ही या चौकशीचे फैरे लावता. तपास यंत्रणा लावता. मग, आपल्याबरोबर आहेत. जे आपल्या सरकारमध्ये आहेत. किंवा आपल्या गटामध्ये जे आहेत. यांची जी प्रकरणे आहेत. त्यांच्यावरीत त्यांच्या भ्रष्टाचारावरती आवाज कोणी उठवायचा.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.