HW News Marathi
महाराष्ट्र

गोपीनाथ मुंडेच्या जयंती निमित्ताने पंकजा मुंडेंचे पत्रातून कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

बीड | भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची १२ डिसेंबरला अपघातात मृत्यू झाला. मुंडेंनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काही दिवसांत त्यांचे दिल्लीमध्ये अपघाती मृत्यू झाला. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वहस्ताक्षरात लिहिलेले पत्र प्रचंड व्हायरल झाले आहे. येत्या १२ डिसेंबर रोजी आपण एक साधा आणि सोपा संकल्प करणार आहोत. तो साध्य करणार का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

लोकनेते मुंडे साहेब यांची १२ डिसेंबरला जयंती आहे. या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी एक पत्र लिहीले आहे. ‘१२ डिसेंबर, ३ जून आणि ‘दसरा’ हे ‘तीन’ दिवस..आपला वचिंतांचा मेळा न चुकता अधिक शक्तीने होतो. याच संपूर्ण श्रेय, तुम्हाला निस्सिम प्रेम करणाऱ्यांनाच जातं. तुमच्या एवढं सच्च अनोखं नात माझ्या जीवनात कोणतंही नाही.

प्रत्येक वर्षी गर्दी, मार्गदर्शन, अनेक सामाजिक उपक्रम आपण घेतो. सामुदायिक विवाह सोहळा, महाआरोग्य शिबीर, अपंग- दिव्यांग सेवा, रक्तदान शिबीर, कोविड सेंटर, अतिवृष्टीसाठी मदत फेरी.. अनेक कार्यक्रम आपण केले, अनेक मान्यवर मा. अमित शहा, मुख्यमंत्री, अनेक ‘केंद्रीय मंत्री’, ‘छत्रपती’ सर्व गडावर आले. गोपीनाथ गडावर संघर्ष ‘उत्थान दिन’ साजरे झाले. अनेक दुःखी कुटुंबियांना मदत केली, अनेक रुग्णांचे इलाज झाले. खुप आशिर्वाद कमवले, हे आशिर्वाद काही कमवण्यासाठी नव्हतेच मुळी.., हे चुकीच्या गोष्टी सुधारणं असतील, सुधारण्यासाठी नाही तर त्या गोष्टी आणि प्रवृतीशी स्वतःचे तत्व कायम ठेवून जगण्यासाठी हे आशिर्वाद कामी येतात. संघर्षाची तमा न बाळगता सत्याची धगधगती मशाल तेजस्वी ठेवण्यासाठी कामाला येतात.

कोणत्याही नात्याविना इतकं प्रेम कसं केलं, तुम्ही साहेबांच्यावर.. आणि काकणभर जास्त माझ्यावर.. नात्याविना प्रेम, माया, आपुलकी ही प्रेमाविना, आपुलकीविना असणा-या नात्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्ही माझे गुरु, माऊली आणि तुम्हीच माझे लेकरं !

या १२ डिसेंबर ला एक संकल्प घ्यावा, म्हणते एक.. का? सोपा आणि साधा संकल्प, कराल का साध्य ? असे त्यांनी विचारले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस अन् गोड चहा घेणं सोडा” – सदाभाऊ खोत

News Desk

‘राजगृह’वर झालेल्या तोडफोडीचा सीसीटीव्ही फुटेज आला समोर

News Desk

शरद पवार कधी क्रिरेट खेळले तरी ते क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत ना? सदाभाऊंचा निशाणा

News Desk