HW News Marathi
महाराष्ट्र

परळी आगाराच्या चालकाने केले विषप्राशन

बीड | परळी आगाराची बस परळी बीड दरम्यान काल (८ नोव्हेंबर) धावली होती. ही बस चालविणाऱ्या चालकांने आज (९ डिसेंबर) सकाळी परळी बस डोपोमध्ये विषप्राशन केले. या चालकाला बीडमधील अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपाचरासाठी दाखल केले आहे. परंतु, विषप्राशन का केले याच कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

परळी आगाराचे एस.टी कर्मचारी गेल्या ३४ दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी एसटीचे शासनात विलनीकरण करा, या मागणीसाठी बेमुद्दत संप सुरू आहे. परंतु काल पहिल्यांदाच नागनाथ गित्ते हा चालक आणी वाहक मोहन गित्ते हे कामावर हजर झाल्याने एस.टी.च्या अधिकारी व पोलीस संरक्षणात परळी बीड बस सोडण्यात आली होती.

दरम्यान, नागनाथ साहेबराव गित्ते हे चालक आज सकाळी परळी आगारात आले. आणि त्यांने विषाप्राशन केल्याची माहिती समोर आली आहे.नागनाथ गित्ते यांनी का विषप्राशन केले हे अद्याप स्पष्ट नाही.नागनाथ गित्ते या चालकास अंबाजोगाई येथील स्वारती रुग्णालयात उपचार करण्यासाठी भरती केले असल्याची माहिती मिळली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणावरील ९ डिसेंबरच्या सुनावणीसाठी वकिलांची समिती जाहीर

News Desk

पूजा चव्हाण प्रकरणावर संजय राऊत म्हणतात…

News Desk

तिसऱ्या लाटेसाठी राज्याची पूर्ण तयारी! तर ‘ते’ पत्र कधीचं, राजेश टोपेंकडून खुलासा!

News Desk