HW News Marathi
महाराष्ट्र

“चंद्रकांत पाटील आधी झोपेतून जागे व्हा”, संजय राऊतांची विखारी टीका!


मुंबई। राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी अर्थातच विधानसभा निकालानंतर राज्यात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला होता. सरकार स्थापन करण्यासाठी चा मुहूर्त सापडत नव्हता. आणि शेवटी त्यावेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पहाटेच्या वेळी शपथ घेत सत्तास्थापन केली होती. मात्र, हे सरकार अवघ्या 80 तासांत कोसळलं. या पहाटेच्या शपथविधीला आज तब्बल 2 वर्षे पूर्ण झाली. त्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि टोलवाटोलवी सुरू आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवीन वर्षात हे सरकार जाणार आहे, असं वक्तव्य केलं. तर शिवसेना खासदार संजय राऊतांनी आधी झोपेतून जागे व्हा, असा पलटवार, वजा टीकाच आता चंद्रकांत पाटलांवर केली आहे.

बहुतेक त्याच शपथविधीचे झटके पाटलांना बसत असावेत

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या अल्पजीवी ठरलेल्या सत्तेला अर्थातच पहाटेच्या शपथविधीला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. बहुतेक त्याच शपथविधीचे झटके पाटलांना बसत असावेत. म्हणून ते सारखं म्हणत आहेत की सरकार पडेल, सरकार पडेल. झोपेतून जागे व्हा, एवढंच मी त्यांना सांगेन, असा टोलाही राऊतांनी चंद्रकांत पाटलांना लगावलाय.

संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली, आणि त्यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नवीन वर्षात हे सरकार जाणार आहे आणि गुढीपाडव्यापर्यंत नव्या सरकारची मुहूर्तमेढ रोवली जाईल, या चंद्रकांत पाटलांच्या विधानाबाबत विचारलं असता, संजय राऊतांनी जोरदार फटकेबाजी केली.

हे सरकार पुढील 25 वर्षे टिकेल

पुढे बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत असंदेखील म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी आतापर्यंत 28 वेळा असं विधान केलं आहे की हे सरकार जाईल. त्याची माझ्याकडे नोंद आहे. त्यांना बोलत राहूद्या. चंद्रकांत पाटील हे भाजपचे राज्याचे अध्यक्ष आहेत. त्यांनी असं बोलणं गरजेचं आहे. त्यांच्या अशा बोलण्याचं काही हे सरकार जात नाही हे सगळ्यांना माहिती आहे. हे सरकार पुढील 25 वर्षे टिकेल आणि या सरकारचं पॉवर सेंटर जिथे आहे तिथे मी आता उभा असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केल आहे.

अवघ्या तीन दिवसात कोसळलं सरकार

फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि पवारांनी उपमुख्यमत्री पदाची शपथ घेतली. यावेळी दोन परस्परविरोधी विचारधारेचे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार हेच सर्वात मोठे आश्चर्या होतं. हे दोन्ही पक्ष एकत्र केस आलं?, हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता. यानंतर अवघ्या दोन दिवसात अजित पवारांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी दिलेला पाठिंबा काढून घेतला. यानंतर फडणवीस सरकार अल्पमतात आल्यानंतर त्यांनी देखील मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे विरोधी विचारधारेचे सरकार अवघ्या तीन दिवसात कोसळलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देश येड्यागबाळ्यांच्या हाती आहे असेच दानवे यांना म्हणायचे आहे काय?

News Desk

“बजेटचा डोंगर, निघाला उंदीर…”,अर्थसंकल्पावर ‘मविआ’च्या आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

Aprna

पंढरपूरसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला ! भगिरथ भालकेंना मिळाली उमेदवारी ..

News Desk