HW News Marathi
महाराष्ट्र

“कोण नारायण राणे माहित नाहीत!”, संजय राऊतांचा नारायण राणेंवर हल्ला

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल(१९ ऑगस्ट) शिवसेना प्रमुख बाळासाहबे ठाकरे यांच्या स्मारकाला वंदन केलं होतं. ते तिथून गेल्यावर शिवसैनिकांनी ते स्मारक शुद्ध करून घेतलं आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात नवीन वादांना तोंड फुटलं आहे. कोण नारायण राणे? यावर मला माहित नाही. आमचे शाखा प्रमुख किंवा आमदार यावर बोलतील. अतिशय स्थानिक विषय हा आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेवर भाष्य केलं.

कोण नारायण राणे?

शिवसेना खासदार संजय राऊत हे कायम त्यांच्या बिनधास्त आणि बेधक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे आहेत. यावेळी मात्र त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर भाष्य करणं टाळलं आहे. यात्रेदरम्यान त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर शिवसैनिकांनी स्मृतीस्थळावर जाऊन गोमूत्र शिंपडून ती जागा पुन्हा ‘पवित्र’ केली आहे.

याबाबत संजय राऊत म्हणाले, “हा स्थानिक विषय आहे. आमचे शाखाप्रमुख किंवा आमदार यावर बोलतील. कोण नारायण राणे? यावर मला माहित नाही”, असं ते म्हणाले आहेत.

जवळ बोलवेन आणि ओळख करुन देईन

समाज राऊत यांनी नारायण राणेंवर टीका केल्यावर आता नारायण राणेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “नारायण राणे कोण आहेत माहीत नाही असं म्हणणाऱ्या संजय राऊत यांना नारायण राणेंनी जोरदार उत्तर दिलं. मी ओळख करुन देईन, जवळ बोलवेन आणि ओळख करुन देईन” असं नारायण राणे म्हणाले आहेत.

ज्यांना गोमूत्र शिंपडायचं आहे त्यांना शिंपडून द्या

नारायण राणे यांनी शिवसैनिकांवर टीकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले, ” ज्यांना गोमूत्र शिंपडायचं आहे त्यांना शिंपडून द्या. ते स्मारक दलदलित आहे. फोटो पण साहेबांचा नीट दिसत नाही. आधी स्वतःचं मन शुद्ध करा. येऊ देणार नाही असं म्हटलं पण आम्ही गेलो तेव्हा तिथे कुणीच नव्हतं. मी जर त्यांचा पुत्र असतो तर येऊच दिलं नसतं. आणि शुद्धीकरण करायला ब्राह्मण लागतात ते कुठे होते? आम्हाला सांगा आमच्याकडे ब्राह्मण आहेत, आम्ही दिले असते”, असा हल्लाबोल राणे यांनी केला आहे.

दलदलीत ते स्मारक

नारायण राणे पुढे बोलताना म्हणाले कि, “फक्ता गोमूत्रं आणि गोमूत्रं या एकाच विषयासाठी आलो आहोत का? मला कुणाला नमस्कार करावा वाटतो, कुणासमोर विनम्र व्हावं वाटतं हा माझा प्रश्न आहे. ते गोमूत्रं ज्यांना शिंपडायचं त्यांना शिंपडू द्या. ज्यांना प्यायचं त्यांना पिऊ द्या. त्यात माझा काय संबंध आहे. ज्यांनी शिंपडलं त्यांना विचारा. काय दुषित झालं होतं. एवढं जर स्मारकाचा अभिमान असेल ना ते स्मारक ज्या स्थितीत आहेत. तिथे जाऊ शकत नाही. पँटवर करून मी आत गेलो. दलदलीत ते स्मारक आहे. राज्याचे मुख्यमंत्री त्यांचे आहेत. अनेक स्मारकं मी पाहिलं. अत्यंत सुशोभित असतात. लॉन आहे. फुलझाडं आहेत. इथे काय आहे. इथे तर फोटोही साहेबांचा दिसत नाही. जे गोमूत्रं शिंपडायला आले ना त्यांनी जागतिक किर्तीचं स्मारक करण्याचा प्रयत्न करा. मग कारभार करा”, असं ते म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यानी कोरोनाचा इतका अभ्यास केला आहे की ते  अर्धे डॉक्टर झाले आहेत – अजित पवार

News Desk

प्रकाश मेहतांच्या समर्थकांनी केली पराग शहांच्या गाडीची तोडफोड

News Desk

बीड पोलीस दलासाठी वाहनांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते संपन्न!

News Desk