HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता धोक्यात, तर लोकप्रिय मुख्यमंत्री यादीत उद्धव ठाकरे चौथ्या स्थानावर!

नवी दिल्ली | देशात गेल्या २ वर्षात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे, दुसरीकडे कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या संकटामुळे आरोग्य व्यवस्थेचा संपूर्ण बोजवारा उडाल्याचं चित्र देशात पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांचा जीव गेला. या विविध घटनांमध्ये एका सर्व्हेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ६६ टक्क्यावरुन २४ टक्क्यांवर आल्याचं म्हटलं आहे.

फक्त २४ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाला पसंती दिली

इंडिया टूडे मूड ऑफ द नेशन पोलने हे सर्वेक्षण केले आहे. विविध घटनांच्या पार्श्वभुमीवर एका इंग्लिश वृत्तवाहिनीने केलेल्या सर्वेक्षणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ६६ टक्क्यांवरुन २४ टक्क्यांवर आल्याचं म्हटलं आहे.

देशाचा पुढील पंतप्रधान कोण असावा? असा प्रश्न विचारण्यात आला होता. ऑगस्ट २०२० मध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाला ६६ टक्के लोकांची पसंती मिळाली होती. मात्र या प्रश्नावर जानेवारी २०२१ मध्ये ३८ टक्के, ऑगस्ट २०२१ मध्ये फक्त २४ टक्के लोकांनी पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाला पसंती दिली होती.

पंतप्रधानांची लोकप्रियता घटली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियेत आता घट होताना दिसत आहे. सर्वेक्षणातून असे दिसून येते की, पंतप्रधानांची लोकप्रियता घटल्याचे म्हणजेच कमी झाल्याचे दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे या सर्वेक्षणातून दुसरी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. भाजपाच्या दोन नेत्यांची लोकप्रियता वाढल्याच दिसुन आले आहे.

सर्वेक्षणानुसार, ऑगस्ट २०२१ मध्ये पंतप्रधानपदासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाला ७ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. जानेवारी २०२१ मध्ये ८ टक्के तर ऑगस्टमध्ये ४ टक्के लोकांनी पंसती दिली आहे.

योगी आदित्यनाथ दुसऱ्या स्थानावर

या सर्व्हेत योगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं नवा आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये पंतप्रधानपदासाठी ११ टक्के लोकांनी योगी आदित्यनाथांनी पसंती दिली आहे. तर जानेवारी २०२१ मध्ये १० टक्के आणि ऑगस्ट २०२० मध्ये केवळ ३ टक्के लोकांनी पसंती दर्शवली होती.

राहूल गांधीच्या नावालाही पंसती

खासदार राहुल गांधी यांच्या नावाला देखील नागरिकांनी पसंती दिली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांची नावं पाहिली तर राहुल गांधी यांच्या नावाला ऑगस्ट २०२१ मध्ये १० टक्के, जानेवारी २०२१ मध्ये ७ टक्के आणि ऑगस्ट २०२० मध्ये ८ टक्के लोकांनी पसंती दाखवली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नावाला ऑगस्ट २०२१ मध्ये ८ टक्के, जानेवारी २०२१ मध्ये ४ टक्के तर ऑगस्ट २०२० मध्ये केवळ २ टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी पसंती दर्शवली होती. तर पश्चिम बंगालच्या आक्रमक नेत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नावाची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. ऑगस्ट २०२० केवळ २ टक्के लोकांनी ममता बॅनर्जींनी पंतप्रधान व्हावं यासाठी पसंती दर्शवली होती. परंतु जानेवारी २०२१ मध्ये हा आकडा दुप्पट होऊन ४ टक्के झाला तर ऑगस्ट २०२१ मध्ये ८ टक्के झाला आहे.

लोकप्रिय मुख्यमंत्री यादीत उद्धव ठाकरे चौथ्या स्थानावर

ज्या प्रमाणे लोकप्रिय पंतप्रधान कोण यावरून लोकांनी त्यांचा कौल दिला आहे, त्याच प्रमाणे लोकप्रिय मुख्यंमत्री कोण? याचा देखील आढावा घेतला गेला आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चौथ्या स्तहनावर आहेत. देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा आणि कामगिरीचं सर्वेक्षण इंडिया टुडे या माध्यम समुहाच्या माध्यमातून करण्यात आलं होतं.

भाजपला चांगलाच झटका बसला आहे. देशातील सर्वात लोकप्रिय असलेल्या 11 मुख्यमंत्र्यांमध्ये 9 मुख्यमंत्री हे भाजपेत्तर पक्षाचे आहेत. योगी आदित्यनाथ यांनाही केवळ 29 टक्के लोकांची पसंती मिळाली आहे. तर, देशातील टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा समावेश आहे.

देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री…

देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या नावांच्या यादीत एम.के. स्टॅलिन यांना पहिली पसंती मिळाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर नवीन पटनायक यांना स्थान मिळाले आहे. केरळचे पिनराईन विजयन, उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जींना अनुक्रमे 3, 4 आणि 5 वे स्थान मिळाले आहे. अकरा जणांच्या या यादीत भाजपचे केवळ 2 मुख्यमंत्री असून हेमंत बिस्वा आणि योगी आदित्यनाथ यांना स्थान मिळाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरमध्ये २४ तासात ५ दहशतवाद्यांना कंठस्नान

swarit

५० लाखांचा विमा उतरवून बहिणीची हत्या

News Desk

“कोणता गुन्हा आणि कृत्य केले की फडणवीसांना त्यांचे मन खाते”, संजय राऊतांचा उलट सवाल

Aprna