HW News Marathi
महाराष्ट्र

“अमरावती दंगलीमागे नवाब मलिकांचाच हात” – हाजी अराफात

मुंबई। राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी त्रिपुरातील घटनेने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी दगडफेक जाळपोळ आणि अन्य काही घटनांनी वातावरण चांगलंच तापलं होतं. विशेषता महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड, आणि मालेगाव आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये त्याचे पडसाद पहायला मिळाले होते. त्यानंतर भाजपकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली. त्यावेळीही मोठ्या प्रमाणात दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये मात्र आता आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतोय. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर आरोप केल्यानंतर मात्र यात आता हाजी अराफात यांनीदेखील उडी घेतली, राज्य अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर पलटवार केला आहे. हाजी अराफात यांनी मात्र खळबळजनक आरोप केलाय. अमरावती दंगलीमागे नवाब मलिकांचाच हात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

नबाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप

अमरावतीत नुकत्याच या दंगली झाल्या त्या दंगलीमागे नवाब मलिक यांचा हात आहे. मलिक यांनी मुंबईतून पैसे पोहोचवण्याचं काम केलं. नवाब मलिक यांचे रझा अकादमीचे प्रमुख सईद नुरींसोबत जुने संबंध आहेत. त्यांनीच ही दंगल घडवून आणली, असा गंभीर आरोप अराफात यांनी केलाय. सईद नुरीसोबत, रझा अकादमीसोबत फोटो जोडण्याचं काम केलं. हा फोटो हजरत नईम यांच्या घरी, मदरसा आणि मशिदीतला आहे. महाविकास आघाडीचे सगळेच मोठे नेते तिथे जातात. जेव्हा जेव्हा एनसीपीचं सरकार आलं तेव्हा सईद नुरी बिळातून बाहेर येतो. भिवंडी, आझाद मैदान सगळ्या दंगलीत त्यांचंच नाव आहे. नवाब मलिक आणि सईद नुरींचे फोटो पाहा. हल्लीच काही कार्यक्रम झाले त्यात हे दोघे एत्रक आल्याचं सांगत अराफात यांनी आता अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केलाय.

नवाब मलिकांचा राज्यात दंगलीचा इरादा आहे

रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू असेल तर उद्धव ठाकरे रझा अकादमीच्या लोकांसोबत कसे? असा प्रश्नदेखील आता अराफात यांनी केलाय. ही दंगल भाजपनेच घडवली याबाबत मलिक यांच्याकडे काही पुरावे आहेत का? मलिकांना आव्हान आहे की सईद नुरीला विचारा नाहीतर मोईन यांना विचारा की फोटो कुठला, असंही अराफात म्हणाले. खिलाफत हाऊसला काय बैठक झाली ती नवाब मलिकांनी राज्याला सांगावं, शरद पवार यांनीही सांगावं, असं आव्हान देतानाच नवाब मलिकांचा राज्यात दंगलीचा इरादा आहे. हिंदू संघटनांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा घणाघात देखील नवाब मलिक यांच्यावर करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तो मटन खातोय आणि तुम्ही आम्ही भजे खाण्यातच खूश”, वडेट्टीवारांची विरोधकांवर टोलेबाजी

News Desk

मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा ;राष्ट्रपतींकडून विधेयकाला मंजुरी

Aprna

आरेतील वृक्षतोडीला तुर्तास स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

News Desk