मुंबई | माझा जुना अर्थवट व्हिडिओ दाखवून दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे, असं स्पष्टीकरण भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं केला आहे. तसेच माझा अर्धवट व्हिडिओ दाखवून दिशाभूल करत प्रयत्न सरकार करत आहे, असा आरोप मुनगंटीवारांनी सरकारवर केला आहे. माझा व्हिडिओ आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा काय संबंध ?, असा उलट सवाल केला असून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य करायला हव्या, असा सल्लाही मुनगंटीवार दिला.
तसेच एसटीच्या आंदोलनात सामील होणाऱ्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सरकार करत असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव घेऊन फसवणूक सरकार करत असल्याचा आरोपही मुनगंटीवारांनी केला आहे. माझा जुना अर्धवट व्हिडिओ व्हायरल दाखवून दिशा भूल करण्याचं काम सुरू असून सरकारकडून शिमग्यांचं राजकारण सुरू केले जात आहे. तसेच माझा अर्धवट व्हिडिओ दाखवून दिशाभूल करत प्रयत्न सरकार करत आहे, असे मुनगंटीवारांनी म्हटलं.
शिवसेनेने मुनगंटीवारांचा व्हिडिओ केला व्हायरल
एसटी कर्मचाऱ्यांचं राज्यात विलिनीकरण करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी केल्या काही दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपनं पाठिंबा दिला आहे. यानंतर शिवसेनेचं खासदार संजय राऊत यांनी मुनगंटीवारांचा एक जुना व्हिडिओ दाखला दिला आहे. राऊत पुढे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या आजच्या मागण्या होत्या. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी सर्व मागण्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले होतं. तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांना त्यांनी दात दिली नव्हती, असंही राऊत काल (१० नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणालं.
मुनगंटीवार व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हणालं
“भाऊ तुम्ही आमचं आमदार आहात, तुम्ही करा. मी ह्या भागाचा आमदार असलो आणि तुम्ही मतदार असला तरी मला हे शक्य नाही. हे विलीनीकरण कायद्यानं करावं लागतं”, असं आपण म्हणाल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.