HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

गजानन किर्तीकर यांच्या प्रवेशाने पक्षाला बळ मिळालं! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई | ठाकरे गटातील आणखी एका खासदाराने शिंदे गटात प्रवेश  केला आहे. शुक्रवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमात गजानन किर्तीकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला असून हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का मानला जातोय. या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अनेक वर्ष कार्यरत असणारे शिवसेना ज्येष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर यांच्या प्रवेशाने पक्षाला नवं बळ मिळालं”, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी नव्या भाजपा – शिवसेना सरकारने चार महिन्यात केलेल्या कामाची माहिती मांडली. तुम्ही टीका करत रहा, मी फक्त कामातून उत्तर देईन, असेही यावेळी मुख्यमत्र्यांनी स्पष्ट केले.

प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात पार पडलेल्या विशेष सोहळ्यात खासदार किर्तीकर यांच्या पक्ष प्रवेशानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी विभाग क्रमांक 10 च्या वतीने मुख्यमंत्र्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह शिवसेना नेते – माजी खासदार आनंदराव अडसूळ, शिवसेना नेते – माजी मंत्री रामदास कदम, शिवसेना गटनेते – खासदार राहुल शेवाळे, शिवसेना नेते विजय शिवतारे, खासदार राहुल शेवाळे, खासदार भावना गवळी, आमदार सदा सरवणकर, आमदार कालिदास कोळंबकर, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ, विभागप्रमुख गिरीश धानुरकर, महिला विभाग संघटिका प्रियाताई गुरव यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

दादर माहीम  परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांना गती दिल्यामुळे लोकसभा गटनेते – खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर यांच्या पुढाकाराने आणि शिवसैनिक व जनतेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात ज्येष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर यांचा पक्षप्रवेश करण्यात आला. कोणत्याही पदाची अपेक्षा न करता केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी आपण पक्षप्रवेश करत असल्याची भावना यावेळी किर्तीकर यांनी व्यक्त केली. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आपल्याला पक्षात सतत डावलले गेल्याची खंतही यावेळी त्यांनी बोलून दाखविली. यापुढे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या बांधणीसाठी, पक्ष शिस्तीसाठी आणि पदाधिकारी कार्यकर्ते घडविण्यासाठी आपण कार्यालयीन कामकाजात अग्रेसर राहणार असल्याचेही किर्तीकर यांनी स्पष्ट केले.शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी या कार्यक्रमात गजानन किर्तीकर यांनी पक्ष प्रवेशाबाबत लिहिलेले वृत्त निवेदन वाचून दाखविले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

येत्या ४८ तासात मुंबई-ठाणे-कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

News Desk

शेतकरी संघटनेचा कुठलाही नेता अमित शहांना भेटणार नाही – राजू शेट्टी

News Desk

पुण्यात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवित राज्यपालांविरोधात केले निदर्शन

Aprna