HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाबाहेर मलिकांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं केलं दहन

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि विधानसभेचं नेते देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये आरोपाच्या फैरी झाडल्या आहेत. मलिकांचा अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचा आरोप काल (९ नोव्हेंबर) फडणवीसांनी केला होता. यानंतर नोटाबंदीनंतर बनावट नोटांच्या रॅकेटला फडणवीसांनी सुरक्षा दिल्याचा आरोप मलिकांनी केला. राज्याच्या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळालं. मलिकांच्या आरोपांनंतर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मलिकांच्या निषेध करण्यासाठी आज (१० नोव्हेंबर) मंत्रालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मलिकांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं.

मंत्रालयाबाहेर भाजपचं कार्यकर्ते मोठ्या संख्यनं जमा झालं होतं. कार्यकर्त्यांनी मलिकांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झालं.आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन जमावला पांगवण्यासाठी कारवाई केली.

नवाब मलिकांचे फडवीसांवर आरोप

पंतप्रधानांनी देशातील काळा पैसा आणि बनावट नोटांना आळा घालण्यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. परंतु, त्यावेळी फडणवीसांनी हे बनावट नोटांचं रॅकेट चालवत होतं, असा आरोप मलिकांनी केला आहे. या काळात राज्यात एकही बनावट नोट सापडली नाही. कारण बनावट नोटांचं रॅकेट हे फडणवीसांच्या पाठिंबा असल्याचंही मलिकांनी सांगितलं. ८ ऑक्टोबर २०१७मध्ये इंटेजिलन्सनं बीकेसीमध्ये छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी १४ कोटी ५६ लाखांच्या खोट्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. परंतु फडणवीसांनी दाबण्याचा प्रयत्न केला, असे ही मलिकांनी म्हणालं

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवाब मलिकांच्या राजीनाम्यांसाठी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप नेत्यांचे आंदोलन

Aprna

“सरकार हमसे डरती है…..पुलिस को आगे करती है”, चित्रा वाघ यांचा सरकारवर हल्ला

News Desk

भिमाकोरेगाव प्रकरणी संभाजी भिडेंना ताब्यात घ्या – आठवले

swarit