HW News Marathi
महाराष्ट्र

मलिकांच्या प्रकरणांचं सर्व पुरावे शरद पवारांकडे देणार!; फडणवीसांचा इशारा

मुंबई | राज्याचं अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचं अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा धक्कादायक खुलासा विधान परिषदेचं विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तसंच मलिकांनी मुंबईत बॉम्ब ब्लास्ट करणाऱ्यांकडून तुम्ही जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. केवळ १ नाही तर मलिकांचा ४ संपत्ती ही अंडरवर्ल्वशी संबंधित असल्याचे फडणवीस म्हणालं. आणि मलिकांच्या प्रकरणांचे सर्व पुरावे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे देणार असून पवारांना देखील त्यांचे मंत्री काय कांड करतात हे त्यांना कळू द्या, असा इशारा फडणवीसांनी आज (९ नोव्हेंबर) परत्रकार परिषदेतून दिला आहे.

“सरदार शहाबली खानला १९९३ बॉम्बब्लास्टचे गुन्हेगार असून यांना जन्मठेप झाली आहे. शहाबली खान हा सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. सरदार शहाबली खान याच्यावर टायगर मेमन याच्या नेतृत्त्वात मुंबई महापालिका आणि बॉम्बे स्टॉक एक्चेंज या दोन्ही ठिकाणी बॉम्ब कुठे ठेवायचा याची रेकी केली होती. तसेच टायगर मेमनच्या घरी बॉम्ब स्फोटाचं जे कारस्थान झालं होतं, त्या सर्व बैठकांना हे उपस्थित होते. तसेच टायगर मेमनच्या घरातील गाड्यांमध्ये आरडीएक्स भरण्यात आलं, त्यामध्येही हे सहभागी होतं.”

जमिनीचा व्यवहार नेमका कसा झाला

मुबंईतील कुर्ल्यात एलबीएस रोडवर जमीन खरेदी केली. या जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी सलीम खान याच्या नावावर आहे. विक्री सरदार शहा वली याच्या नावावर आहे. विक्री सरदार शहा वली याच्या नावावर आहे. सॉलिडस कंपनी नवाब मलिक यांच्या परिवाराची आहे. तसेच सॉलिडसला ही जागा केवळ ३० लाखात विकली गेली. यात मलिक या कंपनीत २०१९पर्यंत होतं. मलिक हे मंत्री झाल्यावर त्यांनी त्या कंपनीच्या पदाचा राजीनामा दिला होता. ही जमीन त्यांनी खरेदी केली. तेव्हा जमिनीची किंमत रेट २ हजार स्क्वेअर फुटनं केली गेली. अंडरवर्ल्ड करुन खरेदी केलेली जमीन ३० लाखात खरेदी केली गेली. पेमेंट झालं २० लाख. सलीम पटेलच्या अकाऊंटवर हे १५ लाख रुपये गेले. उर्वरित रक्कम शाह वली खानला मिळाले.

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुप्रिया सुळेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा !

News Desk

“कुणाचाही आधार घेईन, पण एक रासपचा पंतप्रधान नक्की होईन”, महादेव जानकरांची गर्जना

News Desk

“सरकारच्या बदनामीचे कटकारस्थान,” नवाब मलिकांचा फडणवीसांवर गंभीर आरोप तर दरेकरांचं उत्तर!

News Desk